आरोह वेलणकर: अजानमुळे झोप उडते असं का म्हणाला?

मुंबई तक

अभिनेता आरोह वेलणकरची सध्या झोप उडाली आहे. कोणत्याही कामामुळे,टेन्शनमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेता आरोह वेलणकरला झोप लागत नाहीये. आरोह वेलणकर मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंगमागे असलेल्या मशिदीमधून वेळीअवेळी जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे त्याची सध्या झोप उडाली आहे. आरोहने बुधवारी भल्या सकाळी सोशल मिडीयावर याचा व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली. आरोहने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की माझ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अभिनेता आरोह वेलणकरची सध्या झोप उडाली आहे. कोणत्याही कामामुळे,टेन्शनमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेता आरोह वेलणकरला झोप लागत नाहीये. आरोह वेलणकर मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंगमागे असलेल्या मशिदीमधून वेळीअवेळी जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे त्याची सध्या झोप उडाली आहे. आरोहने बुधवारी भल्या सकाळी सोशल मिडीयावर याचा व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली. आरोहने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की माझ्या घराच्या मागे असलेल्या पठाणवाडी या भागातील मशिदीमधून कोणत्याही वेळी जोरजोरात अजानचे आवाज येत असतात, त्यामुळे आमच्या परिसरातील नागरिकांची झोपेच्या वेळी प्रचंड गैरसोय होते.

अभिनेता आरोह वेलणकर मुंबईतील दिंडोशी भागातील कोर्टाशेजारी असणाऱ्या सुचिधाम सोसायटीत राहतो. या सोसायटीच्या बरोबर मागे पठाणवाडी नावाची वस्ती आहे. या वस्तीतच एक मशिद आहे. या मशिदीमध्ये दिवसातून ५ वेळा मोठ्या आवाजात अजानचे स्वर येत असतात. याबद्दल आरोहने यापूर्वीही सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. ज्यात त्याने आपल्याला या गोष्टींचा प्रचंड त्रास होत असल्याचा पुनुरच्चार केला होता. बुधवारी भल्या सकाळी आरोह वेलणकरने आपल्या सुचिधाम सोसायटीतील घरातून मागच्या मशिदीमधील मोठ्याने आवाज होणाऱ्या अजानचा आवाज एेकवला. ज्यामुळे त्याला आणि येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचं सांगितलं. यापूर्वी २०१७ मध्ये गायक सोनू निगमनेही अजानमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. ज्यात त्याने वेळीअवेळी वाजणाऱ्या अजानबद्ल म्हटलं होतं. तेव्हा खूप मोठा वादही निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे आरोहने आज मोठ्याने होणाऱ्या अजानविरोधात व्हिडिओ पोस्ट केला आहे.