रणबीर कपूरने अॅनिमलसाठी घेतले ”इतके” कोटी, कमाईत अनिल कपूरलाही टाकले मागे
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandanna) यांचा आगामी अॅनिमल चित्रपट लवकरच रीलीज होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच प्री टीझर रिलीज झाला होता. हा टीझर पाहून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandanna) यांचा आगामी अॅनिमल चित्रपट लवकरच रीलीज होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच प्री टीझर रिलीज झाला होता. हा टीझर पाहून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान आता अॅनिमल (animal) चित्रपटाच्या स्टारकास्टचे मानधन समोर आले आहे. या मानधनानुसार आता रणबीर कपूरने या सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. रणबीरने या चित्रपटासाठी जवळपास 70 कोटी रुपये घेतले आहेत. तसेच या मानधनात त्याने बॉलिवुडच्या दिग्गज अभिनेता अनिल कपूरला देखील मागे सोडले आहे. (animal actress fees ranbir kapoor gets highest fees rashmika mandanna anil kapoor bobby deol)
अॅनिमल (animal) या चित्रपटात रणबीर कपूर (ranbir kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचा दिग्गज हिरो बनलेल्या रणबीरने या चित्रपटासाठी जवळपास 70 कोटी रुपये घेतले आहेत. पुष्पा चित्रपटानंतर नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका मंदान्ना (rashmika mandanna) देखील अॅनिमल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. साऊथनंतर हिंदी प्रेक्षकांमध्ये देखील रश्मिका मंदान्ना खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिला आता बॉलिवूड सिनेमांमध्ये संधी मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी जवळपास 4 कोटी रुपये मिळत आहेत.
हे ही वाचा : तेव्हा ‘सीता’ बनलेल्या अभिनेत्रीला मिठीही नव्हते मारू शकत, Kiss तर दूरच: दीपिका चिखलिया
तसेच आश्रम या वेब सीरिजने वेब विश्वात खळबळ माजवणारा अभिनेता बॉबी देओल देखील अॅनिमल या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटातील त्याच्या लूकची बरीच चर्चा आहे. मीडिया रिपार्टनुसार बॉबीला या चित्रपटासाठी 4 कोटी रुपये फी देखील मिळत आहे. यासोबतच एव्हरग्रीन अनिल कपूरही अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अनिलने 2 कोटी रुपये फी घेतल्याची बातमी आहे. तसेच अॅनिमल या चित्रपटात अभिनेता बिपिन कार्कीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना या चित्रपटासाठी 50 लाख रुपये मिळाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान अॅनिमल चित्रपटाचा प्री टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट अॅनिमल या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे.
हे ही वाचा : आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा, अभिनेत्रीच्या कपड्यांवर सापडलं स्पर्म
ADVERTISEMENT