सुशांतसोबतच्या ब्रेकअपवर अंकिता लोखंडेने सोडलं मौन, म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. याशिवाय तिच्याबद्दल अनेक वाईट गोष्टीदेखील बोलण्यात आल्या. दरम्यान अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअपवरही चर्चा केल्या गेल्या. अखेर अंकिताने सुशांतच्या निधनानंतर 9 महिन्यांनी ब्रेकअपच्या कारणांवर खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

सुशांत प्रकरणात माझ्यावर आरोप करू नका- अंकिता लोखंडे

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “त्यावेळी मी माझ्या आणि सुशांतच्या नात्यासाठी खूप काही केलं होतं. मी अशी व्यक्ती नाही जी पर्सनल रिलेशनशिपचा तमाशा बनवेन. आज मला सुशांतबदद्ल अनेक प्रश्न केले जातात. मात्र माझ्या कहाणीबद्दल कोणालाच माहिती नाहीये.”

हे वाचलं का?

अंकिता पुढे म्हणाली, मी यासंदर्भात कोणालाही दोष देणार नाही. सुशांतची निवड अगदी स्पष्ट होती. त्याला करियरमध्ये खूप पुढे जायचं होतं. सुशांतने आपलं करिअर निवडलं आणि तो पुढे गेला.”

ADVERTISEMENT

यापूर्वीही अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यामातून सुशांतच्या प्रकरणात तिला जबाबदार धरू नका असं सांगितलं होतं. ती म्हणाली होती, “जर तुम्हाला एखाद्याच्या नात्याविषयी माहिती नसेल तर त्याविषयी बोलणंही चुकीचं आहे. सुशांतसाठी मी कुठे चुकीची ठरलीये… मला का वाईट बोललं जातंय…? मात्र या सर्व प्रकरणात आपली काहीही चूक नाही, त्यामुळे मला जबाबदार धरू नका.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT