अपूर्वा नेमळेकरने सोडली पम्मीची भूमिका मालिकेत येणार नवीन पम्मी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

झी युवावरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘तुझं माझं जमतंय’ प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. यातील शुभू, आशु आणि पम्मी या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अनोखं सरप्राईज आहे. मालिकेत पम्मीची व्यक्तिरेखा निभावणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडावी लागली. पण आता तिची पम्मी ही व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच असेल. तर पम्मी म्हणून अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे वाचलं का?

देवमाणूस या मालिकेतील मंजुळाच्या भूमिकेतून प्रतीक्षा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. पण आता प्रतीक्षा पम्मी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पम्मी म्हणून देखील प्रतीक्षा प्रेक्षकांचं मन जिंकेल यात शंकाच नाही.या नव्या भूमिकेबद्दल बोलताना प्रतीक्षा म्हणाली, “मंजुळा नंतर अजून एक लोकप्रिय भूमिका माझ्या वाट्याला आली आहे याचा मला आनंद आहे. पम्मी या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि पम्मी या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल मी झी युवाची आभारी आहे. मी साकारणाऱ्या पम्मीवर देखील प्रेक्षक तितकाच प्रेम करतील अशी मला खात्री आहे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT