Accident: दुसऱ्याचा जीव वाचवायला गेली अन्.. 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

bengali tv actress suchandra dasgupta passed away in raod accident
bengali tv actress suchandra dasgupta passed away in raod accident
social share
google news

Bengali Actress Suchandra Dasgupta Death Accident : मनोरंजन विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता (suchandra dasgupta) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तिचे वय अवघे 29 वर्ष होते.या घटनेने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिला आता मनोरंजन विश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.(bengali tv actress suchandra dasgupta passed away in raod accident)

ADVERTISEMENT

सुचंद्रा दासगुप्ता (suchandra dasgupta) हा बंगाली टेलिव्हिजनवरचा (Bengali Industry) खुप प्रसिद्ध चेहला आहे.गौरीसह अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. या मालिकेचे शुटींग पुर्ण करून सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री घरी परतत होती.यासाठी तिने अॅप बाईक बुक केली होती. या अॅप बाईकद्वारे ती बारानगर पोलीस ठाण्याच्या घोसपाडाजवळून प्रवास करताना एक सायकलस्वार रोड क्रास करत होता. या सायकलस्वाराला वाचवण्यासाठी बाईकस्वाराने इमरजन्सी ब्रेक मारला होता. ज्यामुळे सुचंद्रा दासगुप्ता (suchandra dasgupta) खाली कोसळली. आणि मागून येणाऱ्या लॉरीने बाईकला धडक दिली होती. या ध़डेकनंतर मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले.अभिनेत्रीने हेल्मेट घातले होते, तरी देखील तो हेल्मेट तिचा जीव वाचू शकला नाही. या अपघातात सुचंद्रा दासगुप्ता (suchandra dasgupta) हिचा जागीच मृत्यू झाला होता.

हे ही वाचा : कधी चोर.. कधी वेटरची भूमिका साकरणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज घेतो कोट्यवधी रुपये, पण नेहमी अडकतो वादात

या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या घटनेची माहिती मिळताच बारानगर पोलीस (Baranagar Police) घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांनी तत्काळ तणाव नियंत्रणात आणला. तसेच पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे आणि आरोपी चालकाला देखील अटक केली आहे.

हे वाचलं का?

कोण आहे सुचंद्रा दासगुप्ता?

सुचंद्रा दासगुप्ता (suchandra dasgupta) ही बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक फेमस बंगाली टेलिव्हिजन शोमध्ये काम केले होते. गौरीमध्ये सपोर्टींग अभिनेत्रीचा रोलमुळे तिला खुप प्रसिद्धी मिळाल्या होत्या. सुचंद्रा हिची मोठी फॅनफॉलोईंग आहे. सुचंद्रा दासगुप्ताच्या या अचानक निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच आता फॅन्स तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

हे ही वाचा : The Kerala Story : ‘आवडत नसेल तर ते पाहू नका’, सर्वोच्च न्यायालयाने ममतांबरोबर निर्मात्यांनाही झापलं!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT