Santosh Chaudhari: बिग बॉस फेम दादूसकडून हळदीत गोळीबार?, VIDEO व्हायरल
Dadoos: बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस याने एका हळदी कार्यक्रमात गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याबाबत सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT

Dadoos: मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आगरी-कोळी गीतकार बिग बॉस (Bigg Boss) फेम संतोष चौधरी उर्फ दादूस (Santosh Chaudhary aka Dadoos) हळदी कार्यक्रमात हवेत गोळीबार करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता याचा तपास सुरू केला आहे. गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो आर एके मार्ग पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (bigg boss fame santosh chaudhary aka dadoos shooting at haldi program video goes viral)
मध्यरात्री, आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक वराच्या घरी गेले जेथे तो हळदीचा कार्यक्रम करत होता, परंतु वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलिसांनी काही कुटुंबीयांशी बोलले ज्यांनी सांगितले की ही एक खेळण्यांची बंदूक होती, ज्याचा दावा संतोष चौधरी यांनी केला होता. मात्र, घटनेदरम्यान गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी संतोष चौधरी यांच्याशीही संपर्क साधला .
या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तसेच पोलीस कॅमेऱ्यासमोर काही बोलत नाहीत.
दादूस म्हणाला ती खरी बंदूक नाही, तर…
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आज (15 मे) पहाटे गायक संतोष चौधरीची त्याच्या भिवंडीतील राहत्या घरी चौकशी केली. संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी हळदी समारंभातील घटनेची पुष्टी केली. पण त्याने पोलिसांना सांगितले की ती खरी बंदूक नसून ते एक डेमो वेपन आहे. ज्याच्या फायर राउंडमधून फक्त आवाज होतो.. दुसरे काहीही नव्हते.