Bigg Boss OTT 2 winner : घरच आहे 14 कोटींचं, एल्विश यादवची महिन्याची कमाई किती?
हरयाणाचा एल्विस यादव बिग बॉस ओटीटी 2 हंगामाचा विजेता ठरला. एल्विस खूप श्रीमंत असून, त्याचे घरच 14 कोटींचे आहे.
ADVERTISEMENT
Bigg boss ott season 2 winner : बिग बॉस ओटीटीमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या एल्विश यादवने ट्रॉफी जिंकली आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकल्याचे बिग बॉस शोच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. एल्विश यादव (24) हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे. तो एक YouTuber आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर आहे. 2016 मध्ये YouTube प्रवास सुरू करणारा एल्विश यादव आज एक सोशल मीडिया स्टार आहे आणि YouTube च्या माध्यमातून दर महिन्याला लाखोंची कमाई करतो.
ADVERTISEMENT
लक्झरी कार्सचे कलेक्शन
बिग बॉस जिंकल्यानंतर एल्विश यादवला 25 लाखांचे बक्षीस मिळाले. बक्षिसाची ही रक्कम त्याच्या संपत्ती आणि कमाईच्या (एल्विश यादव नेटवर्थ) समोर मोठी रक्कम नाही. पण, बिग बॉसच्या शोमुळे एल्विश यादवचा चाहता वर्ग नक्कीच वाढला आहे. लाइफस्टाइल आणि महागड्या वाहनांमुळे अनेकदा प्रकाशझोतात राहणाऱ्या एल्विशकडे लक्झरी कार्सचा संग्रह आहे. त्याच्याकडे 1.41 कोटी रुपयांच्या पोर्श 718 बॉक्सस्टर कारसह आलिशान घर आहे. हे सर्व त्याने यूट्यूबच्या कमाईतून केले आहे.
चार मजली आलिशान घर
एल्विश यादवच्या कलेक्शनमध्ये Porsche 718 Boxster, Hyundai Verna आणि Toyota Fortuner सारख्या लक्झरी वाहनांचा समावेश आहे. Porsche 718 Boxster ची किंमत 1.41 कोटी रुपये आहे. काही काळापूर्वी एल्विशने वजिराबाद, गुडगाव येथे एक आलिशान चार मजली घर घेतले आहे. घराची किंमत सुमारे 12 ते 14 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का?
वाचा >> Big Boss OTT 2: एल्विश यादवने जिंकली ट्रॉफी, कसा मोडला 16 वर्षांचा रेकॉर्ड?
यूट्यूब व्यतिरिक्त, एल्विश यादव इतर अनेक माध्यमांमधून कमाई करतो. एल्विशचे मासिक उत्पन्न सुमारे 10-15 लाख रुपये आहे आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे. म्हणजे अगदी लहान वयात एल्विश यादवने खूप मोठी संपत्ती जमवली आहे.
एल्विश यादवच्या उत्पन्नाचे स्रोत
युट्युब त्यांच्या व्हिडीओज मध्ये दिसणाऱ्या जाहिरातींवर येणारा पैसे देते. युट्यूबकडून कंटेंटचा दर्जा, प्रदेश आणि इतर अनेक घटकांचा विचार करून वेगवेगळ्या युट्यूबर्ससाठी वेगवेगळ्या स्वरुपात पैसे दिले जातात. अनेक कंटेंट क्रिएटर्स जाहिरातींच्या कमाईच्या 55% पर्यंत कमवू शकतात. एल्विसकडे सिस्टम_क्लॉथिंग नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे. यातूनही तो भरपूर कमावतो. याशिवाय तो जाहिराती, हॉटेल्स, एंडोर्समेंट्स आणि सशुल्क स्पॉन्सरशिपमधूनही भरपूर कमाई करतो.
ADVERTISEMENT
वाचा >> अखेर अक्षय कुमार झाला भारतीय! स्वातंत्र्यदिनी मिळालं मोठं गिफ्ट
सोशल मीडियावर सुपरहिट
एल्विशचे यूट्यूबवर 3 वेगवेगळे चॅनेल आहेत. सर्व चॅनेलवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. ‘Elvish Yadav Vlogs’ वर तो रोजचे अपडेट Vlog शेअर करतो, तर ‘Elvish Yadav’ वर तो त्याच्या शॉर्ट फिल्म अपलोड करतो. एल्विश यादव सेलेब्सचे रोस्टिंग व्हिडिओ देखील बनवतो, ज्यासाठी तो सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. एल्विशचे इन्स्टाग्रामवर 13 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT