बॉलिवूड गाजवलं, पण शेवट झाला खूपच वाईट…; ‘या’ कलाकारांचे झाले प्रचंड हाल
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी उंची तर गाठली पण नंतर थेट जमिनीवर कोसळले. वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण अनेकजण शहाणपणाने निर्णय घेऊन पुढे जातात, तर काहीजण हताश होऊन मृत्यूला कवटाळतात. असेच काही कलाकार आहेत जे कष्टाने पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही संकटात अडकले आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले.
ADVERTISEMENT

मनोरंजन विश्वातून बुधवारी (2 जुलै) एक धक्कादायक बातमी समोर आली. ज्याने सर्वानाच मोठा धक्का बसला. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील ND स्टुडीओमध्ये गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जात बुडाल्याने नितीन यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्यावर 180 कोटी रुपयांचे कर्ज होते, असे सांगितले जातेय. यासाठी त्यांनी त्यांची मालमत्ताही गहाण ठेवली होती. पण त्रासाला कंटाळून त्यांनी हे शेवटचं पाऊल उचललं. (Bollywood Celebrities who Were in limelight but got into trouble and ruined their careers)
चाळीत राहून सामान्य जीवन जगणाऱ्या नितीन देसाईंनी एकेकाळी स्टुडिओ बांधण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे उत्तम चित्रपटांचे चित्रीकरण होईल. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि मोठं नाव कमावलं. पण त्या स्टुडिओत ते स्वत:च आत्महत्त्या करतील असं कुणाच्याही मनी-ध्यानी नव्हतं. गरिबीतून दिवस काढत त्यांनी आपल्या ध्येयाची उंची गाठली.
राहुल गांधींना 2024 ची निवडणूक लढवता येणार का? कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ काय?
त्यांच्यासारखेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी उंची तर गाठली पण नंतर थेट जमिनीवर कोसळले. वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण अनेकजण शहाणपणाने निर्णय घेऊन पुढे जातात, तर काहीजण हताश होऊन मृत्यूला कवटाळतात. असेच काही बॉलिवूडमधील कलाकार आहेत जे कष्टाने पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही संकटात अडकले आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले.
एके हंगल: ‘इतना सन्नाटा क्यों है भाई…’, तुम्हाला शोले चित्रपटातील हा डायलॉग आठवत असेल, तर तुम्हाला एके हंगलही आठवतील. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. आयुष्यात जवळपास 225 चित्रपट केले, खूप प्रसिद्धी मिळवली. पण अंतिम काळात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. वाढत्या वयामुळे त्यांनी काम करणं बंद केलं. ते आजारी असायचे. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही शिल्लक नव्हते. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलालाही नोकरी गमवावी लागली. अमिताभ बच्चन यांनी त्यांना 20 लाख रुपयांची मदत केल्याचे बोलले जाते.