Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाला असणार फक्त २८ पाहुणे; मेहंदी सोहळा कधी?
बॉलिवडूमधील भट्ट आणि कपूर दोन महत्त्वाच्या कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न दोन अवघ्या दिवसांवर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांनाही उत्सुकता असून, आलिया-रणबीरच्या मेहंदी, संगीत सोहळ्यासह लग्नाची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबद्ध होणार असून, […]
ADVERTISEMENT

बॉलिवडूमधील भट्ट आणि कपूर दोन महत्त्वाच्या कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न दोन अवघ्या दिवसांवर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांनाही उत्सुकता असून, आलिया-रणबीरच्या मेहंदी, संगीत सोहळ्यासह लग्नाची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबद्ध होणार असून, वांद्रेतील घरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीरने बिल्डिंगमध्ये हॉल बुक केला असून, सध्या या हॉलची सजावट करण्याचं काम सुरू आहे.
Alia-Ranbir wedding : आलिया भट्ट-रणबीर कपूर १५-१६ एप्रिल नव्हे, तर ‘या’ दिवशी करणार लग्न
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा प्री-वेडिंग समारंभही खास असणार आहे. आलिया आणि रणबीर यांचा संगीत समारंभ आणि मेहंदी सोहळा आरके स्टुडिओमध्ये पार पडणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ एप्रिल रोजी मेहंदी सोहळा होणार आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी हळदी समारंभ असणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी हळदी समारंभ आणि सायंकाळी संगीत सोहळा होणार आहे.










