Deepfake Video: रश्मिका मंदानाचा एवढा बोल्ड व्हिडीओ? हादरवून टाकणारं ‘हे’ प्रकरण काय?
रश्मिका मंदानाचा सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीओवरून जसा तिला धक्का बसला आहे, तसाच धक्का बीग बीनाही बसला आहे. त्यामुळे रश्मिकाआधीच अमिताभ यांनी थेट पोलिसांना आवाहन करत अशा माणसांवर तुम्ही कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT

Viral Video: सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका दुसऱ्याच मुलीचा आहे. मात्र एडिटिंग (Editing) करुन त्या व्हिडीओला (Viral Video) रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या व्हिडीओवरुन प्रचंड गदारोळ चालू आहे. एवढचं नाही तर अमिताभ बच्चननेही हा व्हिडीओ शेअर करत अनेकांना आवाहन केले आहे. एडिटिंग विरोधात बोलताना ते म्हणाले की अशा प्रवृतींविरोधात तात्काळ कारवाई केली पाहिजे. तर आता या डिपफेक (Deepfake) व्हिडीओवर स्वतः रश्मिकानेही प्रतिक्रिया देत तिने आपल्या भावना शेअर केल्या आहेत.
त्या व्हिडीओमुळे मानसिक धक्का
रश्मिकाचा जो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, तो तिने व्हिडीओ शेअर केला नाही, मात्र त्याच्यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. रश्मिकाने लिहिले आहे की, हे सर्व शेअर करताना मला प्रचंड वाईट वाटत आहे. कारण एक व्हिडीओ आहे जो डीपफेक आहे, आणि तो प्रचंड व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीओने मला खूप मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा >>Chhagan Bhujbal : ‘…म्हणून तुमचा तिळपापड झालाय’, मनोज जरांगे भुजबळांना भिडले
धक्कादायक आणि धोकादायक
खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या घटना या माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि धोकादायक आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मात्र मी घाबरली आहे. त्यामुळे आता वाटत आहे की, जे माझ्या बाबतीत घडले आहे, ते इतर कोणाच्याही बाबतीत घडता कामा नये. एखाद्या व्यक्तीसाठी ही प्रचंड धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे काही माणसं ही तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग करतात, त्या गोष्टीचेही मला आश्चर्य वाटत आहे.