तेव्हा ‘सीता’ बनलेल्या अभिनेत्रीला मिठीही नव्हते मारू शकत, Kiss तर दूरच: दीपिका चिखलिया
Dipika Chikhlia reacts Kriti Sanon Om Rauts Kiss Controversy : ‘मी सीतेचे पात्र जगले आहे’, ‘तर आजकालच्या अभिनेत्री तिला फक्त एक भूमिका म्हणून साकारतात’. ‘चित्रपट किंवा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांना त्याची पर्वा नसते’,अशा शब्दात दीपिका चिखलिया यांनी क्रिती सेनॉनला सुनावले आहे.
ADVERTISEMENT
Dipika Chikhlia reacts Kriti Sanon Om Rauts Kiss Controversy : आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सिनेमात सीतेचे पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्री क्रिती सेनॉनला (Kriti Sanon) मंदिर परीसरात दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) किस केल्याची घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी क्रिती सेनॉनला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. या वादावर आता सीतेची भूमिका अजरामर करणाऱ्या दीपिका चिखलियाची (Dipika chikhlia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या काळात सीतेला साधी मिठी देखील मारता येत नव्हती. किस तर दूरचीच गोष्ट आहे. (dipika chikhlia reacts to kriti sanon om raut kiss controversy adipurush prabhas)
ADVERTISEMENT
जेष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika chikhlia) यांनी आजतक डॉट इनशी बातचीत केली. यावेळी दीपिका चिखलिया यांनी क्रिती सेनॉन वादावर भाष्य केले. आजकालच्या कलाकारांची ही एक मोठी समस्या आहे की ते पात्राच्या आत घुसत नाहीत,आणि त्यांच्या भावना देखील समजून घेत नाहीत. क्वचितच तिने या पात्रात तिचा जीव ओतला असेल. त्यांच्यासाठी रामायण हा फक्त एक सिनेमा असेल अशा शब्दात दीपिका चिखलिया यांनी टीका कृतिवर केली.
हे ही वाचा : महाभारतातील ‘शकुनी मामा’ची नेटवर्थ, पाहा किती कोटींची संपत्ती सोडली मागे
क्रिती आजच्या जनरेशनची अभिनेत्री आहे. त्यामुळे आजच्या जगात कोणालाही किस करणे किंवा मिठी मारणे हा स्विट जेस्चर मानला जातो. पण तिने स्वतःला कधीच सीता समजले नसेल. हा भावनेचा विषय आहे, असे देखील चिखलिया म्हणतात. मी सीतेचे पात्र जगले आहे, तर आजकालच्या अभिनेत्री तिला फक्त भूमिका म्हणून साकारतात.चित्रपट किंवा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांना त्याची पर्वा नसते, अशा शब्दात चिखलिया (Dipika chikhlia) यांनी क्रिती सेनॉनवर टीका केली.
हे वाचलं का?
आमच्या सेटवर कुणालाही नावाने हाक मारण्याची हिंमत देखील नव्हती. जेव्हा आम्ही आमच्या पात्रात असायचो,तेव्हा सेटवर येऊन लोक पायांना हात लावायचे. त्यामुळे तो काळ वेगळा होता. त्यावेळी लोक आम्हाला कलाकार नव्हे तर देव मानायचे.त्यामुळे आम्ही कोणालाही साधी मिठी देखील मारू शकत नव्हतो, किस तर दुरची गोष्ट आहे, असे चिखलिया (Dipika chikhlia) म्हणाल्या आहेत.
आदिपुरुषच्या रिलीजनंतर सर्व कलाकार इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतील आणि पात्र देखील विसरतील. याउलट आम्हाला देवासारखे वरून आले आहात, आणि या जगात राहत आहेत, अशी वागणूक दिली जायची. यामुळेच आम्ही लोकांच्या भावना दुखावतील असे काही केले नाही.\
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहणार का? अभिनेते नसीरूद्दीन शाह म्हणाले…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT