बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना ED चं समन्स, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv thackeray and abdu rozik
shiv thackeray and abdu rozik
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस फेम शिव ठाकरे-अब्दू रोजिक ईडीच्या रडारवर

point

शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना ED चं समन्स

Shiv and Abdu summoned by ED: अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) फेम शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक (abdu rozik) यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता त्यांना कथित ड्रग माफिया अली असगर शिराझी याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणीच त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. 

ADVERTISEMENT

'त्या' प्रकरणाचे साक्षीदार

या प्रकरणाची माहिती देताना सांगण्यात आले की, शिव ठाकरेचा या प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर ईडीने त्याचा बिग बॉस 16 चा सह-स्पर्धक असलेला अब्दू रोजिकला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नार्को-फंडिंगवरून आरोप

माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार अली असगर शिराझी यांनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली होती, आणि त्यानेच शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकसह अनेक स्टार्टअप्सना वित्तपुरवठाही केला होता. त्यामुळेच ठाकरे टी अँड स्नॅक्स, फूड अँड स्नॅक्स ब्रँड आणि रेस्टॉरंटसह अनेक स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये नार्को-फंडिंगद्वारे पैसे कमावल्याचा त्यांच्यावर आरोपही करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sanjay Raut: 'भाजपच्या बापाचा पत्ता आहे का?', राऊतांचा भाजपवर घणाघात

मोठी रक्कम गुंतवली

या प्रकरणाची माहिती देताना शिव ठाकरेनी ईडीला दिलेल्या निवेदनात खुलासा केला आहे की, 2022-23 मध्ये कोणाच्या तरी माध्यमातून त्यांनी हसलर्स हॉस्पिटॅलिटीचे संचालक कृणाल ओझा यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे चहा आणि स्नॅक्ससाठीच्या भागीदारीमध्ये करार करण्यात आला होता. त्या करारानुसारच हसलर्स हॉस्पिटॅलिटीने ठाकरे चहा आणि स्नॅक्समध्ये मोठी रक्कम गुंतवली होती असंही शिव ठाकरेने नंतर स्पष्ट केले आहे.  

हे ही वाचा >> मोदींवर टीका करणाऱ्या सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI चा छापा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT