Emraan Hashmi Controversy : ‘तो’ किस आणि ऐश्वर्या राय… इम्रान हाश्मी का सापडला होता वादात?
इम्रान हाश्मी अनेक कारणामुळे वादात सापडला होता. यामधील सर्वाधिक वाद ‘ते किस्स आणि ऐश्वर्या राय प्रकरणात झाला होता. हे वादग्रस्त प्रकरण नेमके काय होते, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Emraan Hashmi Birthday : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडसह विविध क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छा वर्षात होत आहे. बॉलिवूडमध्ये इम्रान हाश्मी सीरीयल किसर म्हणून ओळखला जातो. कारण अभिनयापेक्षा त्याच्या किसींग सीनची जास्त चर्चा असायची. दरम्यान इम्रान हाश्मी (Emraan Hashmi Birthday) अनेक कारणामुळे वादात सापडला होता. यामधील सर्वाधिक वाद ‘ते किस आणि ऐश्वर्या राय प्रकरणात झाला होता. हे वादग्रस्त प्रकरण नेमके काय होते, हे जाणून घेऊयात.(emraan hashmi birthday called aishwarya rai plastic mallika sherawat koffe with karan)
ADVERTISEMENT
प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये पोहोचला होता. या शोमधील चर्चेदरम्यान इम्रान हाश्मीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai) प्लास्टीक म्हटले होते. इम्रानच्या या विधानानंतर निव्वळ मीडियात बातम्याच झाल्या नाही तर तो या प्रकरणात मोठा फसला देखील होता. 2014 दरम्यानची ही घटना आहे.
हे वाचलं का?
ऐश्वर्याला प्लास्टीक म्हणाला?
करण जोहर (Karan Johar) त्याच्या शोमध्ये इम्रान हाश्मीसोबत रॅपीड फायर राऊड खेळत होता.यावेळी करण जोहर जे नाव घेईल त्या नावावरून त्याला अभिनेता, अभिनेत्रीचे नाव सांगायचे आहे. यावेळेस करणने प्लास्टीक असा शब्द उच्चारला, त्यावेळेस इम्रानने ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) नाव घेतले. या त्याच्या विधानानंतर मोठा वाद पेटला होता.तसेन नंतर त्याने एका मुलाखतीत या विधानावर सारवासारव केली होती.
kangana Ranaut Controversy : कंगना-हृतिकचं अफेअर ठरलं वादग्रस्त, वाचा इंटरेस्टींग स्टोरी
मला तसे म्हणायचे नव्हते. मी ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) खुप मोठा फॅन आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. तिच्या कामाचा मी मोठा चाहता आहे. तसेच त्या शोचे तसेच स्वरूप होते. मला माहित होतं लोक हे प्रकरण खुप वाढवून सांगतील, लोक नेहमीच फालतू गोष्टींना मोठ करतात, असे स्पष्टीकरण त्याने दिले होते. तसचे करणने मला ते बोलण्यास भाग पाडले असे देखील एका मुलाखतीत इम्रान म्हणाला.
ADVERTISEMENT
Dalljiet Kaur : घटस्फोटित महिलांना दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या अभिनेत्रीचा खास ‘मेसेज’
किस बद्दल काय म्हणाला?
मर्डर सिनेमात मल्लिका शेरावत (Malliaka Sherawat) सोबत चित्रीत झालेला तो किस सर्वात घाणेरडा किस होता असे देखील इम्रान हाश्मीने म्हटले होते.यावेळी त्याने मल्लिकाचे थेट नाव घेतले होते. तसेच मर्डर 2 सिनेमात जॅकलीन फर्नाडिस सोबत चित्रीत झालेला तो किस सीन सर्वांत चांगला होता, असे देखील इम्रानने म्हटले होते. करणने त्याला सर्वात बेस्ट किस कोणता होता? असा प्रश्न विचारला होता.यावर त्याने वरील उत्तर दिले होते. तसेच इम्रान हाश्मीने त्याच्या सीरीयल किसर इमेजला महेश भट्टला (Mahesh Bhatt) जबाबदार ठरवले होत. या सर्व प्रकरणामुळे तो वादात सापडला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT