अभिनेता सचिन जोशीला ईडीने ठोकल्या बेड्या
ईडीच्या मुंबईतील पथकाने बॉलिवूड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी याला अटक केली आहे. आर्थिक घोटाळ्याचा आरोप सचिन जोशीवर करण्यात आलाय. त्यानंतर रविवारी ईडीकडून सचिनला अटक करण्यात आली आहे. शनिवारपासून सचिनला चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. अटकेपूर्वी सचिनची तब्बल 18 तास चौकशी सुरु होती. ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिन जोशी याची चौकशी […]
ADVERTISEMENT
ईडीच्या मुंबईतील पथकाने बॉलिवूड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी याला अटक केली आहे. आर्थिक घोटाळ्याचा आरोप सचिन जोशीवर करण्यात आलाय. त्यानंतर रविवारी ईडीकडून सचिनला अटक करण्यात आली आहे. शनिवारपासून सचिनला चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. अटकेपूर्वी सचिनची तब्बल 18 तास चौकशी सुरु होती.
ADVERTISEMENT
ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिन जोशी याची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी ओमकार समुहाच्या काही कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. ओमकार समुहात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या सदस्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 22 हजार करोडचा घोटाळा केल्याचा आरोप या समुहावर करण्यात आलाय. शिवाय येस बँकेकडून 450 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन इतर व्यवहारांसाठी वापरल्याचा आरोपही या समुहावर आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात ईडीने ओमकार समुहाचे चेअरमन कमल गुप्ता आणि कार्यकारी संचालक बाबुलाल वर्मा या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर आता अभिनेता सचिन जोशी यालाही अटक करण्यात आलीये.
हे वाचलं का?
अभिनेता सचिन जोशी हा गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा आहे. सचिन जोशीने 2017 मध्ये भारतातून फरार झालेल्या विजय मल्ल्याचा गोव्यातील बंगला 73.01 कोटींना खरेदी केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT