Gufi Paintal : महाभारतातील ‘शकुनी मामा’ची नेटवर्थ, पाहा किती कोटींची संपत्ती सोडली मागे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mahabharat Shakuni Mama gufi paintal passed away age of 79 know about net worth and other assets
Mahabharat Shakuni Mama gufi paintal passed away age of 79 know about net worth and other assets
social share
google news

Gufi Paintal Passed Away : महाभारतमध्ये शकुनी मामा यांची व्यक्तीरेखा साकारून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल (Gufi Paintal) यांचे आज निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते गुफी पेंटल आजारपणामुळे रुग्णालयात होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खुपच नाजूक होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गुफी पेंटल (Gufi Paintal Net Worth) यांनी टीव्ही मालिकांसह सिनेमातही काम करून करोडोची संपत्ती बनवली होती. पण आता हिच करोडोची संपत्ती सोडून ते गेले आहेत. (gufi paintal passed away age of 79 know about net worth and other asset)

नेटवर्थ किती?

4 ऑक्टोबर 1944 म्हणजे भारताच्या आझादीच्या काही वर्षापुर्वी पंजाबच्या तरन तारनमध्ये गुफी पेंटल (Gufi Paintal) यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव सरबजीत पेंटल होते. महाभारतातील शकुनी मामा आणि सीआयडी मालिकेतील अभिनयामुळे ते खुप चर्चेत आले. सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी सत्ते पे सत्ता, गीता मेरा नाम, निकाह सारख्या मोठ्या सिनेमात अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मीडिया रिपोर्टनुसार, गुफी पेंटल (Gufi Paintal Net Worth) यांचे नेटवर्थ साधारण 4 मिलियन डॉलर म्हणजे 33 करोड रूपये होते.

हे ही वाचा : Gufi Paintal: ‘महाभारता’तील ‘शकुनी मामा’ची एक्झिट, गूफी पेंटलांचं निधन

गुफी पेंटल यांच्या कमाईचा स्त्रोत अभिनयच होता. गुफी पेंटल यांच्या करीअरबद्दल बोलायचं झालं तर त्यांची इंजिनियरींग केली होती. त्यानंतर ते अभिनयाकडे वळले होते. बी आऱ चोपडा यांच्या महाभारत मालिकेत शकुनी मामाचा अभिनय करून ते प्रसिद्ध झाले होते. त्यांची पत्नी रेखा पेंटल यांचा 1993 साली हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. तसेच त्यांचा मुलगा हॅरी पटेलचा देखील अभिनयाशी संबंध होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एका एपिसोडचे किती फी घ्यायचे?

मीडिया रिपोर्टनुसार, गुफी पेंटल एका एपिसोडसाठी 40 हजार रूपये फी घ्यायचे. तसेच त्यांची महिन्याची कमाई साधारण 8 लाख रुपये आणि वर्षाची 96 लाख रूपये होती. तसेच मुंबईच्या अंधेरीत त्यांचे स्वत:चे घऱ होते. यासोबतच जाहिरातींद्वारे देखील ते बक्कळ कमाई करायचे. गुफी पेंटर यांना शेवटचं जय कन्हैया लाल की या मालिकेत पाहिले होते.

गुफी पेंटल यांचे आज सकाळी 9 वाजता रूग्णालयात प्राणज्योत माळवली. गुफी यांचे हदय काम करणे बंद झाले होते आणि झोपेतच त्यांचे निधन झाले होते, अशी माहिती पुतना हितने पेंटलने दिली. गुफी पेंटल यांच्यावर आज संध्याकाळी 4 वाजता अंधेरीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गुफी पेंटल यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे आता मुलगा, सून आणि नातू असा परीवार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sulochana Latkar : पडद्यावरील आई गेली! सुलोचना दीदी यांचं निधन

    follow whatsapp

    ADVERTISEMENT