दीपिकाची जबरदस्त एन्ट्री आणि शाहरुखचा जलवा, प्रिव्ह्यू बघितलात का?

रोहिणी ठोंबरे

जवान प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे. पण यापूर्वी किंग खानच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे आणि यामुळेच चाहत्यांची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shahrukh Khan : बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या पठाणनंतर आता अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जवान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवान प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे. पण यापूर्वी किंग खानच्या चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे आणि यामुळेच चाहत्यांची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.

कसा आहे ‘जवान’चा प्रिव्ह्यू?

जबरदस्त! शाहरुखच्या जवानाचा प्रिव्ह्यू पाहून तुम्हालाही हेच वाटेल. स्टार्ट टू एन्ड प्रत्येक सीन हा जबरदस्त आहे. शाहरूखच्या अ‍ॅक्शन आणि स्वॅग तर पाहाण्यासारख्या आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरुख मजेदार डायलॉग म्हणतो, ‘मैं कौन हूं, कौन नहीं, पता नहीं. मां को किया वादा हूं, या अधूरा एक इरादा हूं. मैं अच्छा हूं या बुरा हूं. पुण्य हूं या पाप हूं. ये खुद से पूछना. क्योंकी मै भी आप हूं..’

वाचा : काकाच्या कृत्याने मुंबईत खळबळ! पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार, दिले चटके

अॅक्शन, थ्रिल आणि ड्रामा असलेल्या या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूमध्ये सर्व स्टार्सची झलक दाखवण्यात आली आहे. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणची एन्ट्री आहे. निर्मात्यांनी तिची कास्टिंग आजवर गुपीत ठेवली होती, कोणाला याचा सुगावाही लागला नव्हता. या चित्रपटात दीपिकाची छोटी पण महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. प्रिव्ह्यूमध्ये दीपिकाची एक छोटीशी झलक आहे ज्यामध्ये ती हटके अंदाजात शाहरूख खानसोबत पावसात साडी नेसून लढताना दिसली. तर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉस लेडी लुकमध्ये दिसते. चाहते यावर कमेंट करत म्हणत आहेत की, ‘जर चित्रपटाचा प्रिव्ह्यू एवढा धमाकेदार असेल तर चित्रपट कसा असेल.’

बॉलिवू़ड किंग खानचा जवानमध्ये जलवा

पॉवर पॅक्ड अॅक्शन चित्रपटात नयनतारा शाहरुख खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, विजय सेतुपती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय एका छोट्या भूमिकेत आहे. 12 जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.फाईट सिक्वेन्स हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp