कंगनाने शेअर केला ‘धाकड’च्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शेतकरी आंदोलासंदर्भात सुरु असलेल्या वादावरून अभिनेत्री कंगना राणौत ट्विटवर अॅक्टिव्ह आहे. तर आता कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं आहे. मात्र हे टविट कोणत्या वादासंदर्भात नसून तिच्या आगामी चित्रपटाच्या अॅक्शन सीनचा व्हिडीयो आहे.

ADVERTISEMENT

कंगना सध्या तिच्या आगामी धाकड या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच कंगनाने या सिनेमातील एक अॅक्शन सीन शूट केला आहे. या अॅक्शन सीनचा छोटा व्हिडीयो तिने ट्विटरवर शेअर केला आहे. या सीनसाठी कंगनाने भरपूर मेहनत घेतली आहे. कंगनाच्या म्हणण्याप्रमाणे, या सिनेमाच्या एका सेटसाठी 25 करोड रूपये खर्च करण्यात आलंय.

या व्हिडीयोला कॅप्शन देताना कंगना म्हणते, “मी असा दिग्दर्शक पाहिला नाही जो रिहर्सल्सला इतका वेळ आणि महत्त्व देतात. रात्रीपासून ते आतापर्यंत असा एक मोठा अॅक्शन सीन शूट केला, या सीनची तयारी पाहून मी हैराण आहे. यामध्ये मला खूप शिकायला देखील मिळालं.”

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. 1 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या पोस्टरमध्ये कंगना एकदम डॅशिंग लूकमध्ये दिसून येतेय. या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार दिसतेय आणि तिच्या जवळ मृतदेह असल्याचंही दिसतंय. ‘धाकड’ ही एक स्पाई अॅक्शन फिल्म असणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अर्जुन रामपाल दिसणार आहे. 2019 मध्येच कंगनाने धाकड सिनेमासंदर्भात घोषणा केली होती. त्याचप्रमाणे नुकतंच कंगनाने मणिकर्णिका रिटर्न्स: द लेजेंड ऑफ दिद्दा या सिनेमाचीही घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT