Saif Ali Khan Attack : "सैफ आला नसता तर हल्लेखोराने...", करिना कपूरने पोलिसांना दिली खळबळजनक माहिती
Kareena Kapoor Statement : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सैफ अली खान हल्लाप्रकरणी करिना कपूरने मुंबई पोलिसांना दिला जबाब
करिना कपूर जबाबात काय म्हणाली?
हल्लेखोर घरात घुसल्याचं समजताच सैफने मुलांसह महिलांना 12 व्या मजल्यावर...
Kareena Kapoor Statement : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई पोलिसांनी 35 पथकं बनवल्याची माहिती समोर आलीय. सैफवर झालेल्या हल्लाप्रकरणी त्याच्या घरात असलेल्या मोलकरणीने पोलिसांना जबाब दिला होता. अशातच आता आता करिना कपूरने मुंबई पोलिसांत जबाब नोंदवला आहे. करिनाने वांद्रे पोलिसांना सांगितलं की, सैफने एकट्यानेच हल्लेखोराचा सामना केला. त्याने घरातील सर्व महिलांना बिल्डिंगच्या 12 व्या मजल्यावर पाठवलं. सैफने चोराला अडवलं नसतं तर काहीही झालं नसतं.
करिना कपूर जबाबात काय म्हणाली?
करिनाने जबाबात सांगितलं की, जेव्हा हल्ला झाला त्यावेळी सैफने मुलांना आणि महिलांना 12 व्या मजल्यावर पाठवलं. सैफने महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सैफ होता म्हणून हल्लेखोराला जहांगीर (सैफ-करिनाचा लहाना मुलगा) पर्यंत पोहोचता आलं नाही. हल्लेखोराने घरातून कोणतीही वस्तू चोरली नाही. पण तो खूप आक्रमक होता. त्याने सैफवर अनेकदा हल्ला केला. मी हल्ला झाल्यानंतर घाबरली होती. म्हणून करिष्मा मला घरी घेऊन गेली होती.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! कोर्टात काय घडलं?
याआधी सैफ-करिनाची मुलं-तैमूर-जेहची नैनी (केअरटेकर) ने सांगितलं की, सैफ-करिनाच्या घरी मागील चार वर्षांपासून काम करत आहे. 15 जानेवारीच्या रात्री 2 वाजता एक वेगळा आवाज आल्यानं मला जाग आली. बाथरूमची लाईट सुरु होती. जेव्हा मी पाहायला गेले, तेव्हा एक व्यक्ती बाहेर पडला. तो जेहच्या जवळ जात होता. हे पाहिल्यानंतर मी लगेच मुलांकडे गेली. त्यावेळी तो हाताने इशारा करत म्हणाला, आवाज करू नका. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने माझ्यावर हल्ला केला. त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली. आवाज झाल्यावर सैफ आणि करिना धावले पण त्यावेळी आरोपीने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : आरोपी 5 तास वांद्रेमध्येच होता, एअरफोनही खरेदी केले, CCTV मध्ये काय काय आढळलं?
अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने 16 जानेवारीच्या मध्यरात्री चाकूने जीवघेणा हल्ला केला. मुंबई पोलिसांनी माहिती दिली की, एक अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि तिथे असलेल्या मोलकरणीसोबत बाचाबाची करु लागला. त्यानंतर सैफने या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने धारदास शस्त्राने सैफवर 6 वार केले. या हल्ल्यात नॅनीसुद्धा जखमी झाली. हल्लेखोर पळाल्यानंतर सैफ आणि तैमूर ऑटोने रुग्णालयात पोहोचले.
