केकेचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक? मृत्यूबाबत गूढ कायम
प्रसिद्ध गायक केके यांचं अवघ्या 53 व्या वयात निधन झालं आहे. गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह ताब्यात […]
ADVERTISEMENT

प्रसिद्ध गायक केके यांचं अवघ्या 53 व्या वयात निधन झालं आहे. गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह ताब्यात दिला जाईल.
केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण केकेच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टमनंतरच सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान आता केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्याचं वृत्त आहे.
केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत.