गरजू,गरीब लोकांचं मोफत लसीकरण व्हावं यासाठी लता मंगेशकरांनी सुरू केला ‘श्रीमंगेश व्हँक्सिन फंड’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समाजातील ज्या गरीब व्यक्तींना लसीकरणाचे पैसे देणं परवडणार नाही त्यांच्यासाठी भारतरत्न लता मंगेशकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या गरजू व्यक्तींना लसीकरणाचे पैसे देता येणार नाहीत अशा कुटुंबासाठी लसीकरण मोफत केले जाणार आहे. यासाठी लता मंगेशकरांच्या पुढाकाराने श्रीमंगेश व्हँक्सिन फंडाची स्थापना करण्यात आली आहे. या फंडातून समाजातील गरजू व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

हे लसीकरण सध्या तरी मंगेशकर कुटुंबियांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू सरकारच्या मदतीने राज्यातील इतर रूग्णालयात ही मोफत सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. लता मंगेशकरांनी सोमवारी सोशल मिडीयावर दोन फोटो पोस्ट करत या योजनेविषयी माहिती दिली. लता मंगेशकरांच्या या प्रयत्नामुळे समाजातील गरजू कुटुंबांना मोफत लसीकरण करण्यास फायदा होणार आहे.या मोफत लसीकरणामध्ये घरकाम कामगार कर्मचारी ,फेरीवाले, रस्त्याच्या बाजूला बसणारे भाजी,फळे व किरकोळ विक्रेते,रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी,हातगाडीवाले,रिक्षावाले, तत्सम गरजू व्यक्ती यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT