Shah Rukh Khan : महाराष्ट्र सरकारने शाहरुख खानला अचानक Y+ सुरक्षा का दिलीये?
शाहरुखला धमकीचे फोन येत होते, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शाहरुख खानची सुरक्षा वाढवली आहे. किंग खानला आता Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
-दीपेश त्रिपाठी, मुंबई
ADVERTISEMENT
Shah Rukh Khan Security category : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या जीविताला धोका असल्याचे लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. किंग खानला आता Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे. (Shah Rukh Khan Secruity Increased after gets Death Threat)
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून धुमाकूळ घातला होता. या अभिनेत्याने ‘जवान’ आणि ‘पठाण‘ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची भेट दिली. बॉक्स ऑफिसवरील या मोठ्या यशानंतर शाहरुखला धमकीचे फोन येत आहेत, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शाहरुख खानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का?
शाहरुख खानने आपल्या ‘पठान और जवान’ या चित्रपटाच्या यशानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकारने शाहरुखची सुरक्षा गांभीर्याने घेतली आहे.
किंग खानच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने आयजी व्हीआयपी सुरक्षेचे आदेश दिले आहेत. शाहरुखची सुरक्षा व्यवस्था अपग्रेड करायला हवी, असे त्यांनी सांगितले आहे. शाहरुखला आतापासून Y+ सुरक्षा दिली जाईल. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही सशुल्क सुरक्षा आहे. त्याच्या सुरक्षेचा खर्च शाहरुख स्वतः उचलणार आहे. या सुरक्षेसाठीचे पैसे शाहरुखला सरकारला द्यावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
पोलीस कमांडो शाहरुखसोबत राहणार आहेत
आतापासून सहा पोलीस कमांडो शाहरुख खानसोबत असतील, असे वृत्तांत सांगितले जात आहे. देशभरात अभिनेता कुठेही गेला तरी त्याला सर्वत्र सुरक्षा दिली जाईल. त्याच्या घराबाहेर पोलिसही तैनात असतील.
ADVERTISEMENT
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘जवान’ आणि ‘पठाण’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची भेट शाहरुखने बॉलिवूडला दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT