हास्यजत्रा क्वीन शिवाली परब पडली प्रेमात? हॅशटॅगने चाहत्यांना पाडलं कोड्यात

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab Is in Love her Social Media post gets viral
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab Is in Love her Social Media post gets viral
social share
google news

Shivali parab : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या मराठी कॉमेडी शोद्वारे घराघरात पोहोचलेली शिवाली परब सध्या प्रचंड चर्चेत आहे. शिवाली तिच्या कामामुळे चर्चेत असतेच पण आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. अशीच एक पोस्ट तिने शेअर केली आणि तिच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab Is in Love her Social Media post gets viral)

शिवालीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये शिवालीसोबत दिसणारी ती व्यक्ती कोण आहे?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. शिवालीसोबत दिसणारा हा तरूण हास्यजत्रेतलाच एक अभिनेता आहे. हे फोटो शेअर करताना तिनं लव्ह हा हॅशटॅग दिला आहे ज्यामुळे तिने प्रेमात पडल्याची कबुली दिली असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा: Shiv Sena UBT: ‘राहुल नार्वेकरांची बायकोही ‘तो’ निर्णय…’, संजय राऊतांची तोफ धडाडली

शिवाली परब अभिनेता निमिष कुलकर्णीसोबत दिसतेय. निमिषही हास्यजत्रा या शोमध्ये काम करतो. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवालीने फोटोला कॅप्शन देत लिहिलं आहे की, ‘निमिष की निषिम, सब कल की बाते’ यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं, ‘शिवाली हे खरं आहे का?’, ‘बॉयफ्रेंड की नवरा?’, ‘लग्न कधी करताय?’ असे प्रश्न तिला विचारले जात आहेत.

वाचा: Sharad Pawar : “आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी…”, पवार स्पष्टच बोलले

शिवाली परबची अभिनयातील कारकीर्द

शिवाली ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये झळकत आहे. त्याचबरोबरच तिने ‘व्हॉट्सअॅप लव्ह’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबच ती ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातही झळकली होती. त्यासोबतच ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

ADVERTISEMENT

वाचा: Congress : पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये ‘धुसफूस’, केदार म्हणाले, ‘अन्याय झालाय’

निमिष कुलकर्णीबद्दल बरंच काही…

निमिषबद्दल बोलायचं झालं तर निमिषला अभिनयाची लहानपणापासून आवड. कल्याणमध्ये शाळेत असल्यापासून तो बालनाट्यात कामं करू लागला. पुढे त्याने नाटकातच काम करता यावं म्हणून मुंबईच्या रूपारेल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. नाटकं, एकांकिका करू लागला. यानंतर त्याने ‘हास्यजत्रा’ची ऑडिशन दिली अन् गेल्या चार-पाच वर्षांपासून तो ‘हास्यजत्रे’द्वारे महाराष्ट्राला खळखळून हसवतोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT