मंजिरी फडणीस या मराठी सिनेमात करणार डबल रोल
अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस अदृश्य या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत . नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग डेहराडून येथे सुरू झाले आहे . महत्वाचं म्हणजे अभिनेत्री मंजिरी फडणीस या सिनेमात डबल रोल करताना दिसणार आहे. अदृश्य हा, मंजिरी फडणीसचा दुसरा मराठी चित्रपट आहे. मंजिरी फडणीस मराठी चित्रपटसृष्टीत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस अदृश्य या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत . नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग डेहराडून येथे सुरू झाले आहे . महत्वाचं म्हणजे अभिनेत्री मंजिरी फडणीस या सिनेमात डबल रोल करताना दिसणार आहे. अदृश्य हा, मंजिरी फडणीसचा दुसरा मराठी चित्रपट आहे.
हे वाचलं का?
मंजिरी फडणीस मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या या सिनेमाबद्दल बोलताना मंजिरी म्हणाली “अखेर मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केल्यामुळे मला खूप उत्सुकता आहे,” ती पुढे म्हणाली, “दुहेरी रोल साकारणे खूप आव्हानात्मक आहे. पण त्यासाठी मी खूप चांगला वेळ काढला. पात्रांचे काही पैलू समजून घेण्यासाठी आम्ही थोडे संशोधन केले. शिवाय, मी माझ्या मराठी भाषेवर काम केले आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूडचे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत .कबीर लाल यांनी आज पर्यंत वेलकम बॅक, परदेस , ताल , हम आपके दिल में रेहते है या व अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे तर अजय कुमार सिंग हे निर्माते लवली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करत आहेत .
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT