दिग्दर्शक विवेक वाघ यांच्या ‘जक्कल’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नुकतेच 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आलेत. यामध्ये ‘जक्कल’ या मराठी माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सर्वोत्कृष्ट इन्वेस्टगेटिव्ह चित्रपट’ या नामांकनाअंतर्गत हा पुरस्कार मिळाला असून याचं दिग्दर्शन कल्चरल कॅनव्हास एंटरटेनमेंटचे क्रिएटिव्ह हेड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

दहा निरपराध लोकांच्या खुनाची मालिका पुणे शहराने अनुभवली आहे. आणीबाणीच्या कालखंडातील या हत्याकांडांमुळे संपूर्ण पुणे शहर वेठीला धरलं गेलं होतं. हे हत्याकांड घडवून आणणाऱ्यांचा प्रमुख राजेंद्र यलाप्पा जक्कल हा होता. ह्या सगळ्या घटनेचा, जक्कल वृत्तीचा, गुन्ह्याच्या तपासाचा, कायद्याचा असा मागोवा ह्या महितीपटामधून घेण्यात आलेला आहे. लवकरच या माहितीपटावर आधारित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे वाचलं का?

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील चित्रपटांनी तसंच कलाकरांनी त्यांची छाप पाडली आहे. बेस्ट प्रोडक्शन डिझाईन तसंच सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आनंदी गोपाळ सिनेमाला पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून ‘बार्डो’ची निवड करण्यात आलीये.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तर अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशोक राणे यांचं हे एक आत्मकथनात्मक पुस्तक आहे. अशोक राणेंना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिला पुरस्कार ‘चित्तरकथा’ या पुस्तकासाठी 1996 रोजी तर दुसरा 2003 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT