अग्गंबाई सासूबाई मालिकेचं ‘हे’ असणार नवं नाव

मुंबई तक

अग्गंबाई सासूबाई या मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाई नाही तर अग्गंबाई सूनबाई ही कथा पहायला मिळणार आहे. या नव्या गोष्टीमध्ये आता भित्र्या आसावरीचं नवं रूप पहायला मिळणार आहे. आसावरी आता एक स्ट्राँग बिझनेस वूमन झाली आहे. या नव्या कथेसह मालिकेचं शीर्षक देखील बदलण्यात आलंय. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाईऐवजी अग्गंबाई सूनबाई हे मालिकेचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अग्गंबाई सासूबाई या मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाई नाही तर अग्गंबाई सूनबाई ही कथा पहायला मिळणार आहे. या नव्या गोष्टीमध्ये आता भित्र्या आसावरीचं नवं रूप पहायला मिळणार आहे. आसावरी आता एक स्ट्राँग बिझनेस वूमन झाली आहे. या नव्या कथेसह मालिकेचं शीर्षक देखील बदलण्यात आलंय. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाईऐवजी अग्गंबाई सूनबाई हे मालिकेचं शीर्षक आहे.

झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रचंड गाजली. बबड्या, शुभ्रा, आसावरी तसंच अभिजित राजे या सर्व व्यक्तीरेखा लोकांच्या पसंतीस उतरल्या. मात्र मालिकेच्या कथेत आणि काळात बदल करण्यात आला. याचशिवाय मालिकेच्या पात्रांमध्येही बदल झालेत. अग्गंबाई सूनबाई या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान दिसणार नसून शुभ्राची भूमिका उमा पेंढरकर साकारणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp