Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

nitin desai, famous art director committed suicide in nd studio which location in karjat.
nitin desai, famous art director committed suicide in nd studio which location in karjat.
social share
google news

Nitin Desai Suicide : सिनेसृष्टीसह कला रसिकांना नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या घटनेनं धक्का बसला आहे. नितीन देसाईंनी (Nitin Chandrakant Desai) त्यांच्या एनडी स्टुडिओत (ND studio Karjat) गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाईंनी कुठे आणि कधी आत्महत्या केली, याबद्दल पोलीस सुत्रांनी महत्त्वाची माहिती दिलीये. (Nitin Desai dies by suicide)

सिनेसृष्टीतील (entertainment news in marathi) प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारलेला आहे. तिथेच त्यांनी आयुष्याला पूर्णविराम दिला. नितीन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल माहिती देताना रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, “आज (2 ऑगस्ट) सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना एनडी स्टुडिओमध्ये मिळून आला आहे. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत.”

नितीन देसाई रुममध्ये गेले अन्…

पोलीस सुत्रांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल माहिती दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन देसाई हे मंगळवारी (1 ऑगस्ट) रात्री 10 वाजता एनडी स्टुडिओतील त्यांच्या रुममध्ये निघून गेले. सकाळी बराच उशिरापर्यंत ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंख्याला लटकला होता नितीन देसाईंचा मृतदेह

– दरवाजा वाजवूनही आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने बॉडीगार्ड आणि इतर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे बॉडीगार्डने खिडकीतून आत बघितलं. त्यामुळे नितीन देसाईंचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

वाचा >> Nitin Desai : सिनेसृष्टीवर आघात! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

– नितीन देसाईंचा लटकलेला मृतदेह बघितल्यानंतर बॉडीगार्डने याची माहिती कर्जत पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह खाली घेऊन ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर खोलीची झाडाझडतीही घेतली आहे. मात्र, कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना आढळून आली नाही.

ADVERTISEMENT

त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं -उद्धव ठाकरे

नितीन देसाई यांच्या मृत्युबद्दल शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. अनेक मराठी-हिंदी इतिहासकालीन चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम करुन, प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं आहे, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली”, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक… -देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितीन देसाईंच्या अचानक जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. फडणवीस म्हणाले, “प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला.”

वाचा >> NCP : शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?

“मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांति”, अशा शब्दात फडणवीसांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT