सैराट फेम रिंकू राजगुरू दाखवणार “आठवा रंग प्रेमाचा”
आपल्या सौंदर्यानं आणि अदांनी प्रेक्षकांना मोहवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना आठवा रंग प्रेमाचा दाखवणार आहे. “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शननं “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरित करणार आहे. समीर कर्णिक, राकेश […]
ADVERTISEMENT
आपल्या सौंदर्यानं आणि अदांनी प्रेक्षकांना मोहवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना आठवा रंग प्रेमाचा दाखवणार आहे. “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शननं “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरित करणार आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
ADVERTISEMENT
प्रेम ही संकल्पनाच चिरंतन राहणारी असल्यानं आतापर्यंत प्रेमावरचे अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. “आठवा रंग प्रेमाचा” हा चित्रपट प्रेमाचा वेगळा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. समीर कर्णिक यांनी “क्युं हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधला मोठा अनुभव गाठीशी घेऊन समीर आता निर्माता म्हणून मराठीत पहिलं पाऊल टाकत आहेत.आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हे वाचलं का?
लक्ष्मीकंत बेर्डेची मुलगी मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. हा व्हीडिओ पाहिला की नाही?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT