Sikandar Teaser : "बहुत लोग पीछे पडे़ हैं, बस मेरे...", धमक्या देणाऱ्यांना सलमानचं सिनेमातून उत्तर? सिकंदरमधील या डायलॉगची चर्चा

मुंबई तक

शाहरूख खाननेही जवान चित्रपटातून असंच उत्तर दिल्याची चर्चा झाली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या कारवाईमध्ये आर्यन खानला अटक करण्यात आली होती. यावेळी शाहरूखला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सलमानच्या बहुप्रतिक्षित सिकंदरचा टीझर

point

टीझरमधील सलमानच्या डायलॉगची चर्चा

point

'सलमान खान'ने धमक्या देणाऱ्यांना उत्तर दिलं?

अखेर सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'चा टीझर रिलीज झाला आहे. 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा टीझर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. आज चाहत्यांना 'सिकंदर'ची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. निर्मात्यांनी जसं म्हटलं होतं की, सबर का फल मिठा होता हैं..."  अगदी तसंच झालं आहे. हा टीझर दबंग खानच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सिकंदरचा टीझरमध्ये सलमान खान खास स्वॅगमध्ये दिसतोय. टीझरमध्ये असलेला सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडलाय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हीट ठरणार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. टीझरची सुरुवात सलमानच्या धमाकेदार ॲक्शनने होतेय. सलमानची जिथे एन्ट्री होते, तिथे त्याला बंदुकधाऱ्यांनी घेरलेलं असतं.

हे ही वाचा >>ATS Action on Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईला सुरूवात, राज्यभरातून 16 जणांना अटक

सलमान म्हणतो, "सुना है कि बहुत सारे लोग मेरे पीछे पडे़ हैं. बस मेरे मुड़ने की देर है." असं म्हणत सलमान सर्व बंदूकधाऱ्यांना खास भिडतो. या डायलॉगची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होते आहे. विशेष म्हणजे मागच्या काळात घडलेल्या काही घटनांना सलमानने या टीझरमधील डायलॉगने उत्तर दिलं असल्याचंही म्हटलं जातं आहे. 

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला वारंवार येत असलेल्या धमक्या, त्याच्या घरावर झालेली फायरींग, कर्जतमधील फार्म हाऊसवरील रेकी ते थेट बाबा सिद्दीकी प्रकरणापर्यंत सर्व गोष्टींमुळे सलमानला धोका असल्याचं समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून सलमानला धमक्या दिल्या आहेत. त्यामुळेच सलमानने या डायलॉगमधून उत्तर दिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp