Raj Kundra-Shilp Shetty वेगळे होणार?
राज कुंद्राने ट्विटरवर ट्विट करून सर्वांनाच चकित केलं आहे. त्याने लिहिले की, ‘आम्ही वेगळे झालो आहोत आणि कृपया या कठीण काळात आम्हाला वेळ द्या.’ हे कोणाबद्दल बोलत आहे, ते राज कुंद्राने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलेलं नाही.
ADVERTISEMENT
Raj Kundra-Shilp Shetty Relation : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या जोडीची अनेकदा बॉलिवूडच्या (Bollywood) चौकटीत चर्चा होत असते. चाहत्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे नाते अधिक घट्ट होताना पाहिले आहे. त्यांना कठीण काळात एकमेकांना साथ देताना पाहिलं आहे. राज कुंद्रा तुरुंगत गेल्यानंतर शिल्पा शेट्टीने वाईट काळाचा धीराने सामना केला. यावर UT69 हा चित्रपटही आला. मात्र कठीण परिस्थितीचा सामना करता करता या कपलचं नातं संपुष्टात आल्याचं दिसतं. निदान राज कुंद्राच्या नव्या ट्विटवरून तरी हेच समजतं. (Shilpa Shetty Husband Raj Kundra tweets We have Separated This has led to discussion)
ADVERTISEMENT
राज कुंद्राने ट्विटरवर ट्विट करून सर्वांनाच चकित केलं आहे. त्याने लिहिले की, ‘आम्ही वेगळे झालो आहोत आणि कृपया या कठीण काळात आम्हाला वेळ द्या.’ हे कोणाबद्दल बोलत आहे, ते राज कुंद्राने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलेलं नाही. त्याचं आणि शिल्पा शेट्टीचं नातं खरंच तुटलं की हा विनोद आहे? हे ट्विट पाहून यूजर्सच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. काहींचं म्हणणं आहे की, तो अशाप्रकारे त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय.
वाचा: आईस्क्रिम खायला गेली अन् गर्भवतीचा मृत्यू, रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगलेला चिमुकला
राज कुंद्राच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
युजर्सनी राज कुंद्राच्या ट्विटवर कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं, ‘तुला काय म्हणायचे आहे, वेगळे झाले? घटस्फोट?’ दुसर्याने लिहिले, ‘खूप दुःखी. ही अतिशय धक्कादायक बातमी आहे.’ काहींनी ‘हे नाटक आहे का?, ‘तुम्ही तुमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे सर्व लिहित आहात का?’, ‘पब्लिसिटी स्टंट’, अशा प्रतिक्रिया दिल्या. राज कुंद्राने हे ट्विट का केले आणि त्याचा अर्थ काय आहे हे आता तोच सांगू शकेल.
हे वाचलं का?
राज कुंद्रा बनवत आहे चित्रपट!
राज कुंद्रा 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात गेला होता. आता त्याने त्याच्या अनुभवावर आधारित ‘UT69’ हा चित्रपट आणला आहे. यात तो अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी राजने सांगितले होते की, जेव्हा तो शिल्पासोबत चित्रपट करण्याबद्दल बोलला तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती.
वाचा: एक नाव, दोन व्होट बँक; प्रमोद महाजन यांच्या नावाने योजना सुरू करण्याचे कारण काय?
तो म्हणाला, ‘मी चित्रपट करत असल्याचं शिल्पाला सांगायचं ठरवलं. मी तिला सांगितलं की माझ्याकडे स्क्रिप्ट आहे आणि मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. एवढं बोलून मी वळलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चप्पल मारली. मला वाटले की तिला ही कल्पना थोडी जोखमीची वाटली. कदाचित हा चित्रपट बनणार नाही असे त्याला वाटले.’
ADVERTISEMENT
UT69 चित्रपट कधी प्रदर्शित होईल?
‘UT69′ चित्रपटाचा ट्रेलर 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात गेला होता यावर आधारित आहे. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात राज कुंद्राचे कपडे देखील कसे काढण्यात आले हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याला अतिशय निकृष्ट जेवण दिले जायचे आणि इतर कैद्यांमध्ये त्याचा कसा छळ व्हायचा. त्याची पत्नी शिल्पा शेट्टीबद्दल असभ्य कमेंट ऐकायला मिळायच्या हे सर्व दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याद्वारे राज कुंद्रा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT