ओमकार टॅटूमुळे गदारोळ… पतीच्या मृत्यूनंतर झाली ट्रोल, कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mandira Bedi and controversy : मंदिरा बेदी एक अशी अभिनेत्री आहे जिला स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. म्हणूनच कदाचित वादविवाद तिचा पाठ सोडत नाही. ही अभिनेत्री कधी तिच्या ब्लाउजमुळे चर्चेत आली आहे, तर कधी तिच्या पाठीवर बनवलेल्या टॅटूने तिला अडचणीत आणले आहे. त्याच वेळी, जेव्हा तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एका मित्रासोबत काढलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आले तेव्हा एकदाची हद्द झाली. (Sometimes from modern blouses and sometimes trolls from tattoos; Mandira Bedi and controversy is nothing new)

ADVERTISEMENT

मंदिरा बेदीने खास फोटो शेअर करत मौनी रॉयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मंदिरा 15 एप्रिलला तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्री कोणालाही मात देऊ शकते. मंदिराने 1994 मध्ये शांती या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले. पण 29 वर्षांच्या कारकिर्दीत ही अभिनेत्री अनेक वादांचाही भाग राहिली आहे.

टॅटूवरून वाद

2004 मध्‍ये मंदिराने मानेच्‍या मागच्‍या बाजूला ओंकारचा टॅटू काढला, त्‍यामुळे 2010 मध्‍ये मोठा गोंधळ झाला. तिच्या या टॅटूने अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. एवढा गदारोळ झाला की मंदिराला ते टॅटू काढून टाकावे लागले. त्यावेळी अभिनेत्री मंदिरा खूप नाराज झाली होती.

हे वाचलं का?

या घटनेची आठवण करून देताना मंदिरा म्हणाली, हे सर्व 2007 क्रिकेट विश्वचषकादरम्यान सुरू झाले. त्या दिवशी मी त्या स्पर्धेची तयारी करत होते. पंजाबच्या लोकांनी हा टॅटू टीव्हीवर पाहिला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोकांनी माझा पुतळाही जाळला. मला माफीनामा वर्तमानपत्रात छापून द्यावा लागला. काही दिवस हे प्रकरण शांत झाले होते, पण नंतर दोन वर्षांनी पुन्हा गदारोळ झाला. लुधियाना येथील एका कार्यक्रमासाठी मी साडी नेसली होती. माझ्या मागच्या बाजूने कोणीतरी फोटो काढून प्रकरण उखरले. 2010 च्या निवडणुकांदरम्यान माझ्यावर गुन्हा देखील दाखल केला होता, असं ती म्हणाली.

वयाच्या पन्नाशीतही मंदिराच्या मादक अदा

मंदिरा म्हणाली, मला खूप वाईट वाटायचे की माझे आई-वडील तिथे आहेत. मी प्रत्येक प्रमुख वर्तमानपत्रात माफीनामा दिला होता, पण काही उपयोग झाला नाही. पण हे प्रकरण थंड होण्याचे नाव घेत नव्हते, त्यामुळे मला 2014 मध्ये हा टॅटू काढावा लागला. मला आता लढायचे नव्हते. मला नंतर कळले की टॅटूवर केस होत नसते. पण त्या विचारसरणीच्या लोकांशी लढू शकले नाही. मी खूप रडले. मला कदाचित इतकं वाईट कधीच वाटलं नसेल, असं मंदिरा म्हणाली.

ADVERTISEMENT

पतीच्या मृत्यूनंतर ट्रोल झाली

मंदिराचे पती राज कौशल यांचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही वेळानंतर, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले, ज्यात ती एका जवळच्या मित्रासोबत पूलमध्ये दिसली. मंदिराला दुसऱ्या कुणासोबत बिकिनीमध्ये पाहणे चाहत्यांना आवडले नाही. अभिनेत्री लगेच ट्रोल झाली. पतीच्या मृत्यूबद्दल यूजर्सनी तिच्यावर अनेक टोमणे मारले. ट्रोल्स म्हणाले- नवरा सोडून काही महिनेच झाले असतील, तिला हे शोभतं का?.तिच्या पोस्टवरील अशा कमेंट्स पाहून मंदिरालाही ते सहन झाले नाही, नाराज होऊन तिने कमेंट सेक्शनच बंद केले.

ADVERTISEMENT

फॅशनेबल ब्लाउजमुळे आली होती अडचणीत

मंदिरा बेदी 2003 ते 2007 दरम्यान ICC क्रिकेट विश्वचषकाच्या प्री-मॅच शोमध्ये असायची. तिथे अनेक क्रिकेटपटू तिच्याकडे एकटक पाहत असत. अभिनेत्रीने सांगितले होते की, तिला वाटले की ती एका वेगळ्याच जगातून आली आहे. यादरम्यान, अभिनेत्रीचे नूडल स्ट्रॅप ब्लाउज खूप हिट झाले. मंदिरा म्हणाली, मला चॅनलने सांगितले होते की, तुमच्या मनात जे येईल ते विचारा. पण क्रिकेटपटू माझ्याकडे मी काहीच नेसले नसल्यासारखे टक लावून पाहत होते. पण 150-200 महिलांमध्ये सोनीने माझी निवड केल्याचे समाधान होते, क्रिकेटपटू मला नेहमीच तुच्छतेने पाहत होते, असं ती म्हणाली.

इंटरव्हूय करताना क्रिकेटपटू विचित्र नजरेने पाहायचे, पाहा मंदिरा बेदी असं का म्हणाली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT