क्रिकेट खेळताना सनी लिओनची जोरदार फटकेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुम्ही सनी म्हणजेच सुनिल गावस्कर यांना क्रिकेट खेळताना नक्कीच पाहिलं असेल. मात्र बॉलिवूडची सनी म्हणजेच सनी लिओन हिला कधी क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का? नुकतंच अभिनेत्री सनी लिओनने एक इन्स्टाग्रावर एक व्हिडीयो शेअर केलाय. ज्यामध्ये ती क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसतेय.

ADVERTISEMENT

सध्या सनी स्प्लिट्सविलाच्या शूटींगसाठी रणविजयसोबत केरळमध्ये आहे. यावेळी शूटींगमधून वेळ काढत तिने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडीयोमध्ये सिक्स मारत गोलंदाजाची धुलाई केली आहे. उत्तम सिक्स मारल्यानंतर सनीच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहण्यासारखे होते.

हा व्हिडीयो शेअर करताना सनीने तिच्या फॅन्सना एक प्रश्नही विचारला आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यांसाठी मी माझं कीट पॅक करू शकते का?, असा सवाल सनीने केलाय. दरम्यान सनीची जोरदार फटकेबाजी तिच्या चाहत्यांनाही फार आवडलीये. चाहत्यांनी देखील लगेच तिला इंडियन टीमकडून खेळण्यास सांगितलंय. यापूर्वी देखील सनीने एक व्हिडीयो शेअर केला होता ज्यामध्ये ती फुटबॉल खेळताना दिसत होती.

हे वाचलं का?

सध्या सनी एका अॅक्शन सिरीजवर काम करतेय. 10 एपिसोड्सची ही सिरीज लवकरच तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरिज विक्रम भट्ट यांनी लिहिली असून त्याचं दिग्दर्शनही तेच करणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT