Saie Tamhankar ची ‘द एलेव्हन्थ प्लेस’! नवं पाऊल पण, जुन्या…
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि हॉट अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं हमखास नाव घेतलं जातं. तिची अशी विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सईने तिच्या घराची शिफ्टिंग करण्यापासून ते रूम सोडतानाचे क्षण कसे होते हे दाखवलं आहे.
ADVERTISEMENT
Saie Tamhankar New House In MUmbai : The Eleventh Place : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि हॉट अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं हमखास नाव घेतलं जातं. तिची अशी विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर सईने बॉलिवूडमध्येही काही चित्रपटात काम केलं आहे. सध्या सई एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. (The Eleventh Place Saie Tamhankar’s New House In MUmbai)
ADVERTISEMENT
नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सईने तिच्या घराची शिफ्टिंग करण्यापासून ते रूम सोडतानाचे क्षण कसे होते हे दाखवलं आहे. सईच्या नवीन घरासोबत तिने तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेलदेखील सुरू केलं आहे.
NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
तर हा व्हिडीओ शेअर करत सईने कॅप्शन देत लिहिलं, ‘ द एलेव्हन्थ प्लेस (माझं अकरावं घर)… आज पुन्हा एकदा मनात उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं. मुंबईत पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. आपल्या घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतं.”
हे वाचलं का?
Nagpur News : नागपूरात साजरा होणारा मारबत उत्सव आहे तरी काय?
व्हिडीओत पुढे सई म्हणाली, “या आनंदाच्या क्षणी एक जुनी आठवणही शेअर करावीशी वाटतेय. माझं जुनं घर, त्याच्या त्या ओळखीच्या झालेल्या भिंती, मी आता जुन्या घराचा निरोप घेत आहे. या घरातील प्रत्येक खोलीत आठवणी आहेत. कुजबूज, हास्याचे आवाज आणि अनेक गोष्टी… आज एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे. त्यामुळे भरुन आलंय. या घरातील आठवणी खूप काही शिकवणाऱ्या आहेत. या घराने मला स्वप्न पाहायला शिकवली. त्यामुळेच आज अतिशय कृतज्ञतेने या घराचा निरोप घेत आहे आणि माझ्या हक्काच्या नव्या घरात पाऊल ठेवत आहे.”
सई आता खऱ्या अर्थाने झाली मुंबईकर!
सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. नव्या घराबद्दल चाहत्यांनी तिचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. तिच्या या पोस्टने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT