Scam 2003: ट्रेनमध्ये विकायचा शेंगदाणे! 30,000 कोटींचा घोटाळा करणारा तेलगी कोण?
Abdul Karim Telgi series : कोण होता अब्दुल करीम तेलगी. तेलगीने तब्बल 30 हजार कोटींचा घोटाळा केला होता. त्याचा शिक्षा भोगत असतानाच तुरुंगात मृत्यू झाला होता. यावर आता स्कॅम 2003 ही वेब सीरिज येतेय.
ADVERTISEMENT

What is Telgi scam : ‘स्कॅम 2003’ हा देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा आहे. हा घोटाळा एवढा मोठा होता की, त्यामुळे देशभरात हाहाकार माजला होता. याच घोटाळ्यावर वेब सीरिज आणि चित्रपट येऊन गेलाय. यात हा घोटाळा 30 हजार कोटींचा असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का ती व्यक्ती कोण होती, ज्याने अतिशय हुशारीने ३० हजार कोटींचा घोटाळा केला होता. (Who was Abdul Karim Telgi, who scammed 30 thousand crores)
हंसल मेहता हे इंडस्ट्रीतील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते जेव्हा कधी चित्रपट किंवा मालिका घेऊन येतात, तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा होते. 2020 मध्ये जेव्हा ते ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज घेऊन आले, तेव्हा लोकांनी त्यांचे कौतुक केले. ‘स्कॅम 1992’ नंतर आता त्याच्या ‘स्कॅम 2003’ची चर्चा होत आहे. सत्य घटनेवर आधारित नवीन वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर आधारित आहे. याबद्दल आपण जाणून घेऊयात…
काय आहे ‘स्कॅम 2003’ची कथा?
‘स्कॅम 2003’ ही देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांची कहाणी आहे. हा घोटाळा एवढा मोठा होता की, त्यामुळे देशभरात हाहाकार माजला होता. शोमध्ये 30 हजार कोटींचा घोटाळा असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात या घोटाळ्यात अनेक सरकारी कर्मचारी आणि पोलीस अधिकारी सामील होते. मात्र, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगी होता. याच घोटाळ्याच्या गुन्ह्यात त्याला 30 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
30 हजार कोटींचा घोटाळा
30 हजार कोटींचा स्टॅम्प पेपर घोटाळा करणाऱ्या तेलगीचे कुटुंब कर्नाटकचे रहिवासी होते. तेलगीचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते. लहानपणीच त्याने वडिलांना गमावले. उदरनिर्वाहासाठी त्याने ट्रेनमध्ये शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. शेंगदाणे विकून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पदवीचे शिक्षणही पूर्ण केले.