G20 Summit : भारत-मध्य पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरमुळे चीनचं वाढणार टेन्शन?

रोहिणी ठोंबरे

दिल्लीत सुरू असलेल्या G20 परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली. भारतासोबतच अमेरिका, जर्मनी, यूएई, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन (EU), इटली आणि फ्रान्स या देशांचा या प्रकल्पात सहभाग असेल. भारताशी जोडलेला असा हा पहिलाच शिपिंग आणि रेल्वे कॉरिडॉर असेल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India-Middle East-Europe Connectivity Corridor : दिल्लीत सुरू असलेल्या G20 परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली. भारतासोबतच अमेरिका, जर्मनी, यूएई, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन (EU), इटली आणि फ्रान्स या देशांचा या प्रकल्पात सहभाग असेल. भारताशी जोडलेला असा हा पहिलाच शिपिंग आणि रेल्वे कॉरिडॉर असेल. त्याच्या बांधकाम आणि पायाभूत सुविधांवर सहकार्यासाठी एक करार झाला आहे. (G20 Summit India-Middle East-Europe connectivity corridor will increase China’s tension)

पंतप्रधान मोदींनी एका व्हिडीओ पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘येत्या काळात हा प्रकल्प भारत, पश्चिम आशिया आणि युरोपमधील आर्थिक एकात्मतेसाठी प्रभावी माध्यम ठरेल. हे जगभरात कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रदान करेल. या सुरुवातीसाठी मी सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो. मजबूत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा हा मानवी सभ्यतेच्या विकासाचा मूलभूत पाया आहे. भारताने आपल्या विकासाच्या प्रवासात या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. भौतिक पायाभूत सुविधांसोबतच सामाजिक, डिजिटल आणि आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. याद्वारे आपण विकसित भारताचा भक्कम पाया रचत आहोत. ग्लोबल साउथच्या अनेक देशांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून आम्ही सुरक्षा, रेल्वे, पाणी, तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले आहेत. भारत प्रादेशिक सीमांमधील कनेक्टिव्हिटीत मोजमाप करत नाही. सर्व क्षेत्रांशी संपर्क वाढवणे ही भारताची प्रमुखता आहे. कनेक्टिव्हिटी ही केवळ परस्पर व्यापार वाढवण्यासाठीच नाही तर विविध देशांमधील परस्पर विश्वास वाढवण्यासाठीही आहे.’

Maratha Reservation : आरक्षणाचा पेच, अजित पवारांनी सांगितलं कसा काढणार मार्ग?

या लॉन्चिंगनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले,’हा खूप मोठा करार आहे. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. आम्ही गेल्या वर्षी एकत्र आलो आणि हे व्हिजन पाहिले.’

भारत-मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक्स कॉरिडॉर म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, या कॉरिडॉरद्वारे रेल्वे आणि बंदरांच्या माध्यमातून भारत मध्य पूर्वेशी जोडला जाईल. यामध्ये यूएई, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इस्रायल या देशांचा समावेश असेल. याशिवाय युरोपशीही कनेक्टिव्हिटी जोडली जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारत आणि युरोपमधील व्यापार सुमारे 40 टक्क्यांनी वाढू शकेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp