जुन्या संसदेतील सरकारं हादरवून टाकणारे ऐतिहासिक किस्से! तुम्हाला किती माहितीये
नवीन संसद भवनात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) संसदेचे कामकाज सुरू झाले असून आता जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे करण्यात देण्यात आलं आहे. जरी नवीन संसद भवन सुरू झालं असलं तरी, आपल्या जुन्या संसदेतील असे अनेक किस्से आहेत जे खरोखर धक्कादायक आहेत.
ADVERTISEMENT

Old Parliament Stories : नवीन संसद भवनात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) संसदेचे कामकाज सुरू झाले असून आता जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे करण्यात देण्यात आलं आहे. जरी नवीन संसद भवन सुरू झालं असलं तरी, आपल्या जुन्या संसदेतील असे अनेक किस्से आहेत जे खरोखर धक्कादायक आहेत. ते वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. चला तर मग याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Jawaharlal Nehru Indira Gandhi Firoz Khan Old Parliament Stories)
जेव्हा जावयानेच सासऱ्याचा सरकारी घोटाळा उघडकीस आणला…
ही गोष्ट 1958 सालची आहे. जेव्हा लोकसभेचे अधिवेशन चालू होते. ट्रेजरी बेंचवर बसलेले काँग्रेसचे खासदार बोलायला उभे राहिले. त्यांनी जे सांगितलं त्यामुळे उच्च नैतिक आदर्श असल्याचा दावा करणार्या जवाहरलाल नेहरूंच्या सरकारला हादरवून टाकलं. सरकारमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC ने काही कंपन्यांचे करोडो रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. या कंपन्या कोलकात्याचे व्यापारी हरिदास मुंद्रा यांच्या होत्या.
वाचा : महिला आरक्षण विधेयकाला AIMIM चा विरोध का? असदुद्दीन ओवेसींनी सांगितलं कारण
सत्ताधारी पक्षातील एका खासदाराने केलेल्या या खुलाशामुळे पहिल्यांदाच विरोधकांना मोठा मुद्दा सापडला. स्वतंत्र भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच घोटाळा होता, ज्यात व्यापारी, अधिकारी आणि राजकारणी सामील होते. यामुळे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मोठी बदनामी झाली. कारण हा प्रकार उघडकीस आणणारे दुसरे कोणी नसून त्यांचे जावई खासदार फिरोज गांधी होते.
छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून नेहरू सरकारचे पाय खेचणाऱ्या फिरोज यांनी अखेर 1958 मध्ये ‘एलआयसी-मुंद्रा घोटाळा’ उघड करून देशात राजकीय उलथापालथ घडवून आणली. हा घोटाळा असा होता की हरिदास मुंद्रा यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून एलआयसीला त्यांच्या संशयास्पद कंपन्यांचे शेअर्स चढ्या किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे एलआयसीला करोडोंचे नुकसान सहन करावे लागले.