Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी? काहींच्या पदरात पडेल गडगंज श्रीमंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

9 October 2024 horoscope marathi
Rashi Bhavishya in Marathi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशींना मिळेल पैसाच पैसा?

point

'या' राशींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

point

वाचा सर्व राशींच्या भविष्याची सविस्तर माहिती

11 October 2024 Astrology In Marathi : ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं. यामध्ये सर्व राशी (मेष, वृष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) यांचं दैनंदिन राशी भविष्य सिवस्तरपणे सांगितलं जातं. आजच्या राशी भविष्यात तुमच्यासाठी नोकरी, व्यापार, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबत नातं, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचं भविष्य असतं. जाणून घ्या सर्व राशींचं भविष्य सविस्तरपणे. (The daily horoscope is based on the position of the planets and constellations. In this, the daily horoscope of all zodiac signs Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius and Pisces is told in detail)

ADVERTISEMENT

मेष राशी

तुम्हाला कोणतंही काम धीर ठेऊनच पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. कायदेशीर  गोष्टींमध्ये तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. 

वृषभ राशी 

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शॉपिंगला जाऊ शकता. परंतु, तुम्हाला खूप सावधपणे खर्च करावा लागेल. कुटुंबीयांसोबत तुम्ही पिकनीकचा प्लॅन करु शकता. तुम्ही तुमच्या डाएटवर पूर्णपणे फोकस करा.

हे वाचलं का?

मिथुन राशी

तुमचे विरोधक शांत राहतील. तुम्हाला तुमच्या राहिलेल्या कामांवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावं लागेल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी तुम्हाला सल्ला दिल्यास त्यावर लक्ष केंद्रीत करा. 

कर्क राशी 

मन शांत राहील. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या मित्राकडून धनप्राप्ती होऊ शकते. आईचं सहकार्य लाभेल. खूप खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> माजी आमदाराचा विधानभवनातील खळबळजनक फोटो Viral, महिला अत्याचार प्रकरणी नवा ट्वीस्ट?

सिंह राशी 

मनात नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते. रागाने कोणतच काम करू नका. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरीची संधी मिळू शकते. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

ADVERTISEMENT

कन्या राशी

मनात अस्वस्थता निर्माण होईल. आत्मविश्वास कमी राहील. कामाकाजात समस्या निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. संवाद करताना समतोल ठेवा. एखाद्या मित्रासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात.

तुळा राशी 

कुटुंबाचं सहकार्य लाभेल. कामकाजात प्रगती होईल. वाणीत गोडवा निर्माण होईल. मन अशांत राहील. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक राशी

पार्टनरची साथ मिळेल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. आपल्या घर-परिवारात धार्मिक कार्याचे योग बनू शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. कार्य क्षेत्रात आणि नोकरीत प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत सतर्क राहा. अनावश्यक खर्च टाळा. 

हे ही वाचा >> Crime : तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या! गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

धनु राशी

आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत प्रगती होईल. कौटुंबीक समस्या निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वास भरपूर राहील. 

मकर राशी

नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मन अशांत राहील. खर्च खूप वाढेल. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. मित्रांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. 

कुंभ राशी ­

कामकाज सुधारण्यासाठी बहिण-भावाचं सहकार्य मिळेल. वडिलांकडूनही धनप्राप्ती होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात सुखद अनुभव मिळेल. 

मीन राशी 

आळशी होऊ शकता. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळं कार्यात लाभ होईल. मेहनत खूप घ्यावी लागेल. आईच्या आरोग्याबाबत चिंता राहील. धनप्राप्तीचा योग येऊ शकतो.

टीप - राशी भविष्यात दिलेल्या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही. सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT