Dhanteras 2024 : धन धना धन! धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करावं? जाणून घ्या महत्त्व...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आज 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे.

point

धनत्रयोदशीला सोनं का खरेदी करतात?

point

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचे फायदे काय?

Gold-Silver Buying on Dhanteras 2024 : आज 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदीला विशेष महत्त्व देतात. पण तुम्हाला यामागचं कारण काय आहे, माहितीये का? धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचे फायदे काय आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (dhantrayodashi 2024 why people buy gold silver on this day know shubh muhurat details in marathi

दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी येते. धनत्रयोदशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात, घरी आणतात आणि पूजा करतात. यंदा 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून येत आहे. या दरम्यान खरेदी करणे शुभ मानलं जातं. हा योग सकाळी 6.31 ते दुसऱ्या दिवशी 10.30 पर्यंत असेल.

हेही वाचा : Gold Silver Price on Dhanteras : दिवाळीचा धडाका अन् सोन्याचा भडका! धनत्रयोदशीला आज 24 कॅरेटचा भाव काय?

त्रिपुष्कर योगात नवीन गोष्टी खरेदी केल्यास संप्पतीत तिप्पट वृद्धी होते. यात तुम्ही चांदी, सोनं, दागिने किंवा जमीन खरेदी करु शकता.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धनत्रयोदशीला सोनं का खरेदी करतात?

सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. धनत्रयोदशी म्हणजे आश्विन वद्य त्रयोदशी... या दिवशी माता लक्ष्मी आणि धन देवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभर घरात माता लक्ष्मीची कृपा आणि कुबेर यांचा आशिर्वाद कायम राहावा म्हणून धनत्रयोदशीला त्यांची पूजा केली जाते. सोने म्हणजे माता लक्ष्मीचे रूप असून त्या दिवशी सोने घरात आणणे म्हणजे माता लक्ष्मीला घरात आणणे असे मानले जाते, म्हणून धनतेरसला घरात सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते.
   
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी संपत्तीची देवी समजली जाणारी लक्ष्मी देवी प्रकट झाली. म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन सोने-चांदी घरी आणते आणि घरात सुख-शांती नांदते.

हेही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळीत मुसळधार पावसाची एन्ट्री? 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!

भेटवस्तू देण्याची उत्तम संधी

धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोन्या-चांदीचे दागिने देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता. भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याचे भावनिक मूल्य आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला दागिने देता तेव्हा ते प्रत्येक वेळी ते घालतात तेव्हा ते तुम्हाला आठवते आणि ते दागिने अनेक पिढ्यांपासून वापरले जातात.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT