Green Revolution in India: डुकरांना दिला जाणारा गहू भारतात आला अन् ‘हरित क्रांती’ची पडली ठिणगी!
आपल्या भारत देशाने उपासमारीचा प्रदीर्घ काळही सोसला आहे. मग एक क्रांती सुरू झाली. ज्यासाठी शस्त्रांची नाही तर अवजारांची गरज होती. या क्रांतीमध्ये मनकोम्बु सांबशिवन स्वामिनाथन हे अग्रभागी योद्धा होते. भारतातील महान शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी 27 सप्टेंबर 2023 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या स्मरणार्थ आज आपण हरित क्रांतीचा इतिहास जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

History of Green Revolution in India : आपल्या भारत देशाने उपासमारीचा प्रदीर्घ काळही सोसला आहे. आपण गुलाम होतो. आपले अन्न हिसकावून रणांगणात पाठवले गेले. त्यानंतर आपण आझाद झालो. मात्र, तरीही उपासमारीची गुलामगिरी संपली नव्हती. मग एक क्रांती सुरू झाली. ज्यासाठी शस्त्रांची नाही तर अवजारांची गरज होती. (History of Green Revolution in India Important role of MS Swaminathan)

या क्रांतीमध्ये मनकोम्बु सांबशिवन स्वामिनाथन हे अग्रभागी योद्धा होते. भारतातील महान शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी 27 सप्टेंबर 2023 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या स्मरणार्थ आज आपण हरित क्रांतीचा इतिहास जाणून घेऊयात.
धक्कादायक! पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचं आधी अपहरण, नंतर…
हरित क्रांतीचा खरा इतिहास काय?
1900 ते 1947 या काळात भारताचा कृषी विकास दर शून्य टक्के होता. इंग्रजांनी या ‘सोन्याची खाण’ असलेल्या देशाचे अन्नाच्या एक-एका कणासाठी हाल केले. एक प्रसंग असा आला की बंगालचे लोक उपासमारीने मरत होते आणि चर्चिल म्हणत होते की, ‘मुलं कमी जन्माला घाला.’ जे अन्नधान्य भुकेल्या मुलांच्या मुखापर्यंत पोहोचायचे होते ते युद्धाच्या भट्टीत फेकले गेले. लाखो लोक मारले गेले. यामुळे स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नेहरू म्हणाले, “बाकी सर्व गोष्टींची वाट पाहिली जाऊ शकते पण शेती, अन्न-धान्यांची नाही.” भुकेले लोक राष्ट्र निर्माण करू शकत नाहीत म्हणून शेतीवर भर दिला गेला. जमीनदारी संपवून शेतकऱ्यांना मालकी हक्क देण्यात आला. धरणे झाली. पण हे पुरेसे नव्हते.










