Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?
chhatrapati shivaji maharaj wagh nakh : अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी वध केला. ही वाघनखे लंडनमधील संग्रहालयात असून, ती परत आणली जाणार आहेत.
ADVERTISEMENT

Shivaji Maharaj Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास शस्त्र ‘वाघनखे’ लवकरच देशात परत आणण्याची तयारी सुरू आहे. या वाघनखानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. वाघनखे गेल्या अनेक दशकांपासून लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी आता ते ‘वाघनखे’ परत करण्याचे मान्य केले आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिवाजी काळातील हे खास शस्त्र परत येणार आहे. ते परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय यांच्या शिष्टमंडळाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आणि इतर संग्रहालयांना भेट दिली आणि तेथे एक करार झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही ‘वाघनखे’ एक ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो आणि त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. वाघाच्या पंजाप्रमाणे हे शस्त्र असून, ‘वाघनखे’ ब्रिटनमधून परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाघनखांची कथा काय?
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते.