Chandrayaan-3 नंतर ISRO चं लक्ष सूर्यावर, कशी असेल Aditya-L1 मोहीम?
14 ऑगस्ट रोजी इस्रोने ‘आदित्य-L1’ मोहिमेशी संबंधित काही फोटो शेअर केले होते. सूर्याचा अभ्यास करणारी इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. इस्रोने याबाबत ट्वीटरवर पोस्ट करून माहिती दिली.
ADVERTISEMENT

Aditya-L1 Mission : चांद्रयान 3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. इस्रोच्या या चांद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनला आहे. खरं तर आता भारताची चंद्रानंतर सूर्याच्या जवळ जाण्याची तयारी सुरू आहे. इस्रोच्या या मिशनचे नाव ‘आदित्य-L1’ आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रो काय प्रयत्न करत आहे? यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा काय फायदा होईल? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. (ISRO’s focus on MISSION Sun after Chandrayaan-3 how will Aditya-L1 mission be)
‘आदित्य-L1’ मोहिमेची तयारी कुठपर्यंत पोहोचली?
14 ऑगस्ट रोजी इस्रोने ‘आदित्य-L1’ मोहिमेशी संबंधित काही फोटो शेअर केले होते. सूर्याचा अभ्यास करणारी इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. इस्रोने याबाबत ट्वीटरवर पोस्ट करून माहिती दिली.
Ajit Pawar Press : ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा’; भुजबळांच्या भाषणावर अजितदादा बोलले
पोस्ट मध्ये लिहिलं होतं की, “PSLV-C57/Aditya-L1 मोहीम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेली अवकाश-आधारित वेधशाळा (ऑब्जर्वेटरी) आहे. ते प्रक्षेपणासाठी तयार केले जात आहे. याची सॅटेलाइट बंगळुरू येथील यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC) येथे तयार करण्यात आली असून ती श्रीहरिकोटा येथे पोहोचली आहे.”
इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नीलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही मोहीम 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित केली जाऊ शकते. आदित्य-एल1 मिशन सूर्याचे खूप जवळून निरीक्षण करेल. सूर्याचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राची माहिती गोळा करेल. त्यात 7 पेलोड बसवण्यात आले आहेत. जे सूर्याची किरणं आणि त्यातून निघणारे रेडिएशन, सोलर वादळ, फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांचा अभ्यास करतील. याशिवाय सूर्याचे इमेजिंग केले जाईल.