जुन्या संसदेतील सरकारं हादरवून टाकणारे ऐतिहासिक किस्से! तुम्हाला किती माहितीये

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Old Parliament Stories : नवीन संसद भवनात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) संसदेचे कामकाज सुरू झाले असून आता जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे करण्यात देण्यात आलं आहे. जरी नवीन संसद भवन सुरू झालं असलं तरी, आपल्या जुन्या संसदेतील असे अनेक किस्से आहेत जे खरोखर धक्कादायक आहेत. ते वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. चला तर मग याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Jawaharlal Nehru Indira Gandhi Firoz Khan Old Parliament Stories)

ADVERTISEMENT

जेव्हा जावयानेच सासऱ्याचा सरकारी घोटाळा उघडकीस आणला…

ही गोष्ट 1958 सालची आहे. जेव्हा लोकसभेचे अधिवेशन चालू होते. ट्रेजरी बेंचवर बसलेले काँग्रेसचे खासदार बोलायला उभे राहिले. त्यांनी जे सांगितलं त्यामुळे उच्च नैतिक आदर्श असल्याचा दावा करणार्‍या जवाहरलाल नेहरूंच्या सरकारला हादरवून टाकलं. सरकारमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC ने काही कंपन्यांचे करोडो रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. या कंपन्या कोलकात्याचे व्यापारी हरिदास मुंद्रा यांच्या होत्या.

वाचा : महिला आरक्षण विधेयकाला AIMIM चा विरोध का? असदुद्दीन ओवेसींनी सांगितलं कारण

सत्ताधारी पक्षातील एका खासदाराने केलेल्या या खुलाशामुळे पहिल्यांदाच विरोधकांना मोठा मुद्दा सापडला. स्वतंत्र भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच घोटाळा होता, ज्यात व्यापारी, अधिकारी आणि राजकारणी सामील होते. यामुळे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मोठी बदनामी झाली. कारण हा प्रकार उघडकीस आणणारे दुसरे कोणी नसून त्यांचे जावई खासदार फिरोज गांधी होते.

हे वाचलं का?

छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून नेहरू सरकारचे पाय खेचणाऱ्या फिरोज यांनी अखेर 1958 मध्ये ‘एलआयसी-मुंद्रा घोटाळा’ उघड करून देशात राजकीय उलथापालथ घडवून आणली. हा घोटाळा असा होता की हरिदास मुंद्रा यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून एलआयसीला त्यांच्या संशयास्पद कंपन्यांचे शेअर्स चढ्या किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे एलआयसीला करोडोंचे नुकसान सहन करावे लागले.

संसदेत घोटाळा उघड करताना फिरोज गांधी यांनी आरोप केला की, प्रधान वित्त सचिव एचएम पटेल आणि अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांनी मुंद्राच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीवर दबाव आणला. काही कागद दाखवत तो म्हणाला की त्याच्याकडे याचा पुरावा आहे. यावरून या दोघांमधील संगनमत दिसून येते. याबाबत टीटी कृष्णमाचारी यांना सभागृहात विचारण्यात आले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. या प्रकरणाची चौकशी झाली आणि अर्थमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. न्यायालयाच्या आदेशावरून अनेक अधिकाऱ्यांवर खटला सुरू झाला.

ADVERTISEMENT

या घोटाळ्यापूर्वीच नेहरूंचे अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी आणि फिरोज गांधी यांच्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या होत्या. असे म्हटले जाते की एकदा सभागृहात कृष्णमाचारी यांनी फिरोज गांधींना नेहरूंचा ‘लॅपडॉग’ म्हणजेच ‘पाळीव कुत्रा’ म्हटलं होतं. त्यावर फिरोज गांधी यांनी लगेचच उत्तर दिलं. ते प्रत्युत्तर देत म्हणाले, ‘कृष्णमाचारी स्वतःला राष्ट्राचा आधारस्तंभ मानत असल्याने, कुत्रा सामान्यतः स्तंभासोबत जे करतो तेच ते त्यांच्यासोबत करतील.’

ADVERTISEMENT

त्यानंतरच फिरोज गांधींनी ‘एलआयसी-मुंद्रा घोटाळा’ उघड करून कृष्णमाचारी यांच्या राजकीय कारकिर्दीला डाग लावला.

वाचा : ब्रिटनमधील गणेशोत्सव पोलिसांनी रोखला, व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधानांची उडवली खिल्ली!

लोकसभेतील समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. लोहिया यांनी 1962 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू समोर असल्याने जिंकण्याची आशा फार कमी होती. परिणामी लोहिया यांचा निवडणुकीत पराभव झाला. पण अवघ्या एक वर्षानंतर, म्हणजे 1963 मध्ये उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा जागेवर पोटनिवडणूक झाली, त्यात लोहिया यांनी दावा ठोकला आणि विजयी झाले. पहिल्यांदा संसदेत पोहोचले. लोहिया यांनी संसदेत नेहरूंविरुद्ध बोलण्याची एकही संधी सोडली नाही. ते नेहरूंना ‘स्यूडो-सेक्युलर’ आणि इतर अनेक अपमानास्पद शब्द म्हणायचे, पण नेहरूंनी ते कधीही वैयक्तिकरित्या घेतले नाही.

लोहिया यांनी लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात जे काही सांगितले ते इतिहासात नोंदवले गेलेहे. हे भाषण आजही ‘तीन आना बनाम पंधरा आना’ म्हणून ओळखलं जातं. लोहिया म्हणाले होते की, देशातील एकूण लोकसंख्येच्या 27 कोटी लोकसंख्येपैकी 60 टक्के लोक दररोज तीन आण्यांवर जगत आहेत. तर पंतप्रधानांच्या कुत्र्यावर दररोज तीन रुपये खर्च होतात. खुद्द पंतप्रधानांच्या सुरक्षेवर रोज 25 हजार रुपये खर्च होतात.

लोहिया यांच्या या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले की, ‘नियोजन आयोगाच्या अहवालानुसार देशातील 70 टक्के लोक रोज 15 आणे कमावत आहेत.’ लोहिया यांनी नेहरूंना आव्हान दिले की, जर पंतप्रधानांनी नियोजन आयोगाचे विधान खरे असल्याचे सिद्ध केले तर ते लोकसभेचा तात्काळ राजीनामा देतील. याचे उत्तर नेहरूंकडे नव्हते.

लोहिया आणि नेहरू यांच्यातील वादाचीही एक रंजक घटना आहे. एकदा संसदेत चर्चेदरम्यान राम मनोहर लोहिया यांनी सभागृहात सांगितले की, नेहरू खानदानी घराण्यातील नव्हते जसे त्यांच्याबद्दल प्रचार केला जात होता. लोहिया पुढे म्हणाले, “मी हे सिद्ध करू शकतो की पंतप्रधान नेहरूंचे आजोबा मुघल दरबारात शिपाई होते.” असे म्हटले जाते की यावर नेहरू स्मित हसले आणि उभे राहिले आणि म्हणाले होते, “मला आनंद आहे की संसदेच्या सन्माननीय सदस्याने शेवटी ते केले. त्यांना इतके वर्ष जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते स्वीकारले की, मी सामान्य लोकांपैकी आहे आणि मी त्यांच्यासारखाच आहे.”

या चर्चेदरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसच्या एकाही खासदाराने उठून जाब विचारला नाही की, लोहिया आमच्या नेत्याला शिपायाचा नातू का म्हटलं.

वाचा : Gold-Silver Price Today :  सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही झाली घट

‘मी टक्कल पडलेल्या डोक्याचं काय करू?’ जेव्हा पंतप्रधानांना मंत्र्यानेच संसदेत विचारला प्रश्न..

भारताची गोलाकार संसद आणखी एका घडामोडीची साक्षीदार ठरली. 1962 च्या युद्धानंतर भारताचा अक्साई चीन भाग चीनकडे गेला. त्यामुळे जवाहरलाल नेहरू सरकारवर संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत यावर बरीच टीका झाली. संसदेत अनेक दिवस प्रचंड गदारोळ सुरू होता. एके दिवशी चर्चेदरम्यान जवाहरलाल नेहरूंनी संसदेत विधान केले की, अक्साई चिनमध्ये गवताचा एक भुसाही उगवत नाही, हा एक ओसाड प्रदेश आहे.

हे विधान केल्यावर त्यांचा एक मंत्री आपल्या विधानाला कडाडून विरोध करेल अशी अपेक्षा नेहरूंना नव्हती. हे मंत्री होते काँग्रेस नेते महावीर त्यागी. त्यागी हे काँग्रेसचे अतिशय गतिमान नेते होते. ते ब्रिटीश सैन्यात अधिकारी होते आणि स्वातंत्र्य सैनिक होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. मग स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी त्यांना मंत्री केले.

पंतप्रधान नेहरूंनी जेव्हा अक्साई चिन विधान केले तेव्हा महावीर त्यागी संसदेत उभे राहिले आणि नेहरूंना आपले टक्कल दाखवू लागले. ते म्हणाले होते, ‘इथेही काही उगवले नाही तर मी हे डोकं कापावं की दुसऱ्याला द्यावं?’ त्यांच्या एका जवळच्या मंत्र्याचे हे उत्तर ऐकून नेहरू थक्क झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT