Kitchen Tips: स्टीलची भांडी काळीकुट्ट झाली? 'या' ट्रिक्सचा वापर करा, भांडी नव्यासारखी चमकतील!
How To Clean A Stainless Steel Spoon: काळानुसार स्टीलचे चमच्यांची चमक कमी कमी होत जाते. याशिवाय मसाले आणि तेलाचे कण चमच्यांना चिकटतात आणि नंतर ते पिवळे झाल्यासारखे वाटतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
स्टीलची भांडी काळीकुट्ट झालीत? फक्त हे काम करा
स्टीलची भांडी चमकण्यासाठी काय कराल?
जबरदस्त किचन टीप्स वाचा एका क्लिकवर
How To Clean A Stainless Steel Spoon: काळानुसार स्टीलचे चमच्यांची चमक कमी कमी होत जाते. याशिवाय मसाले आणि तेलाचे कण चमच्यांना चिकटतात आणि नंतर ते पिवळे झाल्यासारखे वाटतात. अशातच तुम्ही या भांड्यांना साफ करण्यासाठी काही किचन टीप्स फॉलो करू शकता. या भांड्यांना साफ केल्यानंतर त्यांची चमकही पहिल्यासारखी होईल. गंज लागलेल्या स्टीलच्या भांड्यांना साफ करण्यासाठीही या ट्रिक्सचा उपयोग होईल.स्टीलच्या भांड्यांच्या सफाईसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की, तुम्ही या भांड्यांमध्ये साचलेली घाण साफ करा. भांड्यांना साफ न ठेवल्याने ते पिवळे झाल्यासारखे वाटतात. किचनच्या या टीप्सबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती
स्टीलची भांडी चमकण्यासाठी काय कराल?
- एका कढईत पाणी उकळा.
- यामध्ये मीठ आणि अॅल्युमिनियम फॉईल टाका.
- बेकिंग सोडा टाका आणि त्यानंतर या भांड्यांना पाण्यात टाकून गरम करा.
- ही भांडी गरम केल्यानंतर साफ होतील
- भांडी चमकायला लागल्यावर पुन्हा एकदा थंड पाण्याने या भांड्यांना साफ करा
- त्यानंतर ही भांडी कपड्याने साफ करा.
- या पद्धतीमुळे ही भांडी साफ होतील आणि चमकतीलही.
हे ही वाचा >> Job Selection Tips: ...तरच तुमचं जॉब सिलेक्शन पक्क! कंपनीत CV पाठवण्याची योग्य वेळ कोणती?
गरम पाणी लिक्विड डिटर्जेंटच्या मदतीने तुम्ही स्टीलची भांडी साफ करू शकता. गरम पाण्यात थोडसं लिक्विड डिटर्जेंट टाका आणि भांडी या पाण्यात साफ करा. या भांड्यांना स्क्रब करून साफ करा. यानंतर थंड पाण्याने या भांड्यांना साफ करा आणि कॉटनच्या कपड्यांनी भांडी पुन्हा एकदा पुसून घ्या. याप्रकारे स्टीलची भांडी चमकण्यास मदत होईल.
हे ही वाचा >> Optical illusion : डोळ्यांना चकवा देणारा फोटो व्हायरल! हुशार आहात? मग शोधून दाखवा या फोटोत लपलेले अंक
याशिवाय गरम पाण्यात बेकिंग सोडा टाकून ही भांडी साफ करा. तसच बेकिंग सोडा आणि लिंबू पाणी मिक्स करून एक लेप तयार करा आणि त्यानंतर या भांड्यांना साफ करा. यामुळे या भांड्यांना पुन्हा एकदा नव्यासारखी चमक येईल आणि ही भांडी पहिल्यासारखी नवी कोरी होतील.









