Ladki Bahin Yojana : 31 ऑगस्ट शेवटची तारीख नाही! सरकार अर्ज करण्यासाठी देणार मुदतवाढ?
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : खरं तर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत देखील संपली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेची मुदत संपली
31 ऑगस्ट अर्जाची अंतिम मुदत होती
अर्ज करण्यास मुदतवाढ मिळणार
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिलांच्या खात्यात (Bank Account) पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अर्ज मंजुर झालेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. तर अद्याप ज्या महिलांनी अर्जच केले नाही आहेत, आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायचे बाकी आहेत, त्या महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने लाडकी बहिण योजनेत (Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (ladki bahin yojana big update on last date of application mukhymantri majhi ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis)
खरं तर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत देखील संपली आहे. आणि अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्ज करायचे बाकी आहेत. त्यामुळे महिलांना योजनेची अंतिम मुदत काय असणार आहे? असा प्रश्न पडला आहे. अशात आता मुदत वाढीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
हे ही वाचा : Vanraj Andekar Murder CCTV: माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा खून नेमका झाला कसा? हादरवून टाकणारा Video आला समोर
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लाडकी बहीण योजनेची मुदत आता नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मुदतवाढ जाहीर करतील, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाला सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
''राज्याने 4,500 कोटी रुपयांचे प्रारंभिक बजेट वाटप जाहीर केले होते आणि सुमारे 1 कोटी लाभार्थ्यांना जून आणि जुलैसाठी सुमारे 3,000 कोटी रुपये वितरित केले होते. निधी ही समस्या नाही आणि उर्वरित रक्कम आम्हाला मिळेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखी तीन महिने नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा आहे'', अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
दरम्यान आकडेवारीनुसार 31 ऑगस्टपर्यंत राज्यभरातून सुमारे 2.26 कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननीनंतर तब्बल 2.1 कोटी अर्ज स्वीकारण्यात आले. 1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी 3,000 रुपये आधीच मिळाले आहेत. अनेक लाभार्थींकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत. त्यामुळे त्या महिलांना आता सप्टेंबरमध्ये अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sharad Pawar : "शिवरायांची तुलना सावरकरांशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं
ADVERTISEMENT