Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! योजनेबाबत सरकारने दिली मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने नुकताच चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे दसरा आणि दिवाळीआधी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली होती. असे असतानाच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ
महिलांना आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार
फक्त चार दिवसाची मिळाली मुदत
Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने नुकताच चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे दसरा आणि दिवाळीआधी लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली होती. असे असतानाच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. (ladki bahin yojana scheme government extension application deadline for mukhymantri majhi ladki bahin bahin yojana eknath shinde)
ADVERTISEMENT
राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेत अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. याआधी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती.मात्र तरी देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चे 7500 आणि 3000 आले की नाही? सोप्या स्टेप्सने लगेच तपासा
ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरले नाहीयेत, त्यांनी आताच अर्ज भरून घ्या.
दरम्यान लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते 15 ऑक्टोंबर करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT