Ladki Bahin Yojana : 'या' दिवशी 4500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'या' दिवशी महिलांच्या खात्यात पैसे येणार
महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार
तुमच्या अर्जाचं काय?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सूरू आहेत. लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून (Anganwadi Sevika) मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह आता 4500 रूपये नेमके महिलांच्या खात्यात (Bank Account) कधी जमा होणार? याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे. (ladki bahin yojana scheme these women account deoposit 4500 mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)
लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.
हे ही वाचा : Maharashtra Assembly Election Survey : ठाकरेंना बसणार जबर झटका, विधानसभेत शिंदेंचं काय होणार? खळबळजनक सर्व्हे
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.
'या' महिलांना फक्त 1500 मिळणार?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यातस जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : मैत्रिणीनेच केला घात! गुंगीचे औषध देऊन मित्रांकडून बलात्कार, बदलापूर पुन्हा हादरलं
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT