Ladki Bahin Yojana Date Extended 2024: आता 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख, मिळणार थेट 4500 रुपये..
Ladki Bahin Yojana application last date: माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तारीख सरकारकडून वाढविण्यात आली असून त्याचा बराचसा फायदा हा राज्यातील महिलांना होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली
शिंदे सरकारने घेतला तारीख वाढविण्याचा निर्णय
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर करा अर्ज
Ladki Bahin Yojana Date Extended 2024: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे अशा सर्व महिला आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. (mazi ladki bahin yojana date extended 2024 rs 4500 will be received directly)
या योजनेंतर्गत, पहिल्या दोन महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्ता थेट DBT द्वारे अनेक महिलांच्या बँक खात्यांवर पाठविला गेला आहे. 29 ऑगस्ट रोजी 50 लाख महिलांच्या बँक खात्यांवर पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करा. तुम्ही नारी शक्ती ॲप्लिकेशन आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: शिंदे सरकारचा आणखी मोठा निर्णय, अर्ज करण्याची तारीखच...
Ladki Bahin Yojana Date Extended
| आर्टिकल |
Ladki Bahin Yojana Date Extended |
माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्षांवरील सर्व पात्र महिला
महाराष्ट्र
लाभार्थी महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये
महिलांची आर्थिक स्थिती सुधारणं
2024
ऑनलाइन/ऑफलाइन
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&hl=en
30 सप्टेंबर 2024
माझी लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख का वाढवली?
राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. या योजनेअंतर्गत, 14 ऑगस्ट रोजी 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर 3000 रुपयांचा पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता 29 ऑगस्ट रोजी 50 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय, थेट GR करा डाऊनलोड!
अजूनही 27 लाखांहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अद्याप महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल. यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3 महिन्यांचा हप्ता हा एकाच वेळी जमा होईल. दरम्यान, राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकल्या नाहीत, त्यामुळेच आता सरकारने अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत केली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावेत.
- महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- या योजनेसाठी केवळ विवाहित, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलाच अर्ज करू शकतात.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- डोमेसाईल प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- स्वयंघोषणा फॉर्म (हमीपत्र)
- अर्ज फॉर्म
Ladki Bahin Yojana Important Dates
| योजनेची घोषणा |
शिंदे सरकार |
1 जुलै 2024
15 जुलै 2024
16 ते 20 जुलै
21 ते 30 जुलै
1 ऑगस्ट
14 ऑगस्टपासून
31 ऑगस्ट 2024
30 सप्टेंबर 2024
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही ऑफलाइन पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट आणि नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून ऑनलाइन अर्ज करू शकता. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 57 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
