Generation Beta : आजपासून जन्माला येणारी मुलं जनरेशन बीटा... कशी ठेवली जातात जनरेशनची नावं?
2025 ते 2039 जनरेशन बीटा या काळात अर्थातच आज 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. 2025 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना 'बीटा किड्स' म्हटलं जाईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जनरेशनची नावं कशी ठेवली जातात?
यापूर्वीच्या जनरेशनची काय काय होती नावं?
आजपासून जन्माला आलेली मुलं जनरेशन बीटा
News Generation Beta : जनरेशन Z किंवा जेन्झी आणि जनरेशन अल्फाचा अर्थ लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यातच आता जनरेशन बिटा सुरू झाली आहे. आजपासून जन्माला येणाऱ्या या नव्या पिढीचे नाव आहे 'जनरेशन बीटा'. 1 जानेवारी 2025 पासून जन्मलेल्या मुलांना 'जनरेशन बीटा' असं नाव देण्यात आलं आहे.
साधारणपणे कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे (युद्ध, आर्थिक वाढ किंवा कोणताही मोठा तांत्रिक बदल) ठरवला जातो. या पिढ्या सहसा 15-20 वर्षांच्या कालावधीसाठी ठरवल्या जातात.
पिढ्यांची नावं आणि त्यामागच्या कथा...
1. जनरेशन Z: 1997-2009
1997 ते 2009 या काळात जन्माला आलेल्या पिढीला जन्मत:च इंटरनेट आणि सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म मिळाले. डिजिटल युगात वाढणारी ही पिढी स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. डिजिटल युगात सोशल मीडियावरून पैसे कसे कमवायचे हे या पिढीला चांगलंच माहीत आहे.









