Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?
PM Narendra Modi property : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारचे बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड (MF) मध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. तथापि, जर आपण बचतीबद्दल बोललो तर त्याची पोस्ट ऑफिस आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक आहे.
ADVERTISEMENT
Narendra modi net worth in marathi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (17 सप्टेंबर 2023) 73 वा वाढदिवस (Prime Minister Narendra Modi Birthday) आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. 2014 पासून ते सतत पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का पीएम नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो आणि त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे?
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती पगार मिळतो?
पंतप्रधानांबद्दल जाणून घेण्याचं कुतुहल लोकांमध्ये असते. पंतप्रधानांकडे काय आहे? त्यांचे घर कुठे आहे? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे? असे आणि यासारखे प्रश्न लोकांच्या मनात असतात.
हे वाचलं का >> NCP Election Commission : ‘तो’ प्रश्न अन् अजित पवार चिडले, पुण्यात काय घडलं?
गेल्या वर्षी पंतप्रधान कार्यालयाने (PMO Office) याबाबत संपूर्ण माहिती शेअर केली होती. आता आधी पंतप्रधानांच्या पगाराबद्दल जाणून घेऊयात… भारताच्या पंतप्रधानांचा पगार वर्षाला सुमारे 20 लाख रुपये आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून महिन्याला पगार सुमारे 2 लाख रुपये आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधानांना मिळणाऱ्या पगारामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते समाविष्ट असतात.
हे वाचलं का?
इतकी आहे पीएम मोदींची नेटवर्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्च 2022 पर्यंतच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील PMO कार्यालयाने 2022 मध्ये जाहीर केला होता. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
MOTN : शाह, गडकरी की योगी… मोदींचा उत्तम उत्तराधिकारी कोण? लोक म्हणतात…
पीएमओच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवर नजर टाकली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक 2.23 कोटी रुपयांची संपत्ती बँक खात्यांमध्ये जमा आहे.
ADVERTISEMENT
मोदींकडे नाही कोणतीही स्थावर मालमत्ता
पीएमओने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता (जमीन) नाही. गुजरातमधील गांधीनगर येथे त्यांच्या मालकीची जमीन होती, जी त्यांनी दान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. तिसरा हिस्सेदार म्हणून त्याचा यात सहभाग होता. परंतु, स्थावर मालमत्तेचा सर्व्हे क्रमांक ४०१/ए वर आता त्यांच्याकडे कोणताही मालकी हक्क नाहीत, कारण त्यांनी आपला हिस्सा दान केला आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींकडे स्वतःचे वाहनही नाही
एका अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही प्रकारचे बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंड (एमएफ) मध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. याशिवाय त्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही वाहन नाही. तथापि, मार्च 2022 पर्यंतच्या मालमत्तेच्या आकडेवारीनुसार, त्याच्याकडे निश्चितपणे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. पोस्ट ऑफिसमध्ये 9,05,105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) आणि 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT