Rajiv Gandhi Life Story: व्हायचं होतं पायलट, पण बनले पंतप्रधान; कशी झाली होती राजकारणात एन्ट्री?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर त्यांना आदरांजली वाहिली. पायलट बनू इच्छिणाऱ्या राजीव गांधींनी राजकारणात कशी एन्ट्री केली आणि पंतप्रधान म्हणून कोणत्या कामगिरीसाठी ते आजही स्मरणात आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. (Rajiv Gandhi wanted to be a pilot but became prime minister How was the entry in politics)

ADVERTISEMENT

राजीव गांधींचं बालपण कसं आणि कुठे गेलं?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मुलगा राजीव यांचे नाव त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आजी कमला नेहरू यांच्या नावावरून ठेवले होते. कमला म्हणजे कमळाच्या फुलावर विराजमान असलेली देवी लक्ष्मी आणि राजीव हा कमलचा समानार्थी शब्द आहे. राजीव गांधी यांचे बालपण तीन मूर्ती भवनात गेले. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, ते काही काळ डेहराडूनमधील वेल्हॅम शाळेत शिकले पण नंतर त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत पाठवण्यात आले.

Dilip walse Patil : ‘बरे झाले मनातील विष बाहेर पडतेय’, जितेंद्र आव्हाड भडकले

तिथे राजीव गांधींनी अनेक मित्र बनवले. पुढे त्यांचे धाकटे भाऊ संजय गांधी यांनाही त्याच शाळेत पाठवण्यात आले जिथे दोघे एकत्र शिकले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव गांधी पुढील शिक्षणासाठी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गेले. त्यांनी नंतर ट्रिनिटी कॉलेजचा निरोप घेतला आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे गेले, तिथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

हे वाचलं का?

राजीव गांधी आणि सोनिया गांधींची पहिली भेट कशी झाली?

राजीव गांधी केंब्रिजमध्ये शिकत होते, त्याचवेळी त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली. सोनिया गांधी मूळच्या इटालियन विद्यार्थिनी होत्या आणि त्यावेळी त्या केंब्रिजमध्ये इंग्रजी शिकत होत्या. दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं आणि नंतर दोघेही भारतात आले तेव्हा सोनिया गांधी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या घरी राहिल्या.

यानंतर अमिताभ बच्चन यांच्या आईकडून राजीव यांची आई इंदिरा गांधी यांना त्यांच्या प्रेमाची गोष्ट कळली. नंतर अमिताभ बच्चन यांच्याच आई-वडिलांनी सोनिया गांधींचे कन्यादान केले. राजीव यांनी 1968 मध्ये सोनियाशी लग्न केले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत.

ADVERTISEMENT

राजीव गांधींना विमान उड्डाणाची होती आवड!

राजीव गांधींना राजकारणात कधीच रस नव्हता. त्यांना पायलट व्हायचं होते. इंग्लंडमधून भारतात आल्यानंतर राजीव प्रथम दिल्लीच्या फ्लाइंग क्लबचे सदस्य झाले आणि पायलट होण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासून पायलट बनण्याची आवड होती. लग्नानंतर राहुल गांधींच्या जन्माच्या वेळी त्यांनी एअर इंडियामध्ये पायलटची नोकरी स्वीकारली होती. त्यावेळी त्यांचा पगार होता फक्त ५ हजार रुपये महिना आणि राजीव गांधी त्यात समाधानी होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

ADVERTISEMENT

Crime: एक-एक करून सात बाळांची हत्या, हॉस्पिटलची नर्सचं चिमुकल्यांच्या जीवावर का उठली?

भावाच्या मृत्यूने आयुष्यच बदलून गेलं…

राजीव यांचे मोठे भाऊ संजय गांधी यांचं 1980 मध्ये विमान अपघातात निधन झालं. यानंतर सर्व काही बदललं. इंदिरा गांधींचा राजकीय वारसा सांभाळणारे संजय गांधी गेल्यानंतर इंदिरा गांधींची आशा राजीव गांधींवर विसावली. राजीव यांनी मन नसतानाही आईचं म्हणणं स्वीकारलं आणि ते पायलटची नोकरी सोडून राजकारणात आले. राजीव गांधी यांनी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. या जागेवरून ते विजयी झाले आणि पहिल्यांदाच संसदेत पोहोचले.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी झाले पंतप्रधान!

31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अवघ्या दोन महिन्यांनी डिसेंबर 1984 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत काँग्रेसने 524 पैकी 415 जागा जिंकल्या.

‘या’ कामगिरीसाठी राजीव गांधीं आजही आहेत स्मरणात!

  • मतदानासाठी वयोमर्यादा कमी केली– यापूर्वी देशात मतदानाची वयोमर्यादा 21 वर्ष होती, जी तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दृष्टीने चुकीची होती. 18 वर्षीय तरुणांना मताधिकार देऊन देशाप्रती अधिक जबाबदार आणि सक्षम बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1989 मध्ये, मतदानाची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे करण्यात आली.
  • संगणक क्रांती– राजीव गांधींचा विश्वास होता की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय उद्योगांचा विकास होऊ शकत नाही. भारतात संगणक क्रांती आणण्याचे श्रेय राजीव गांधींना जाते. त्यांनी केवळ भारतातील घराघरात संगणक पोहोचवण्याचे काम केले नाही तर माहिती तंत्रज्ञान भारतात पुढे नेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • पंचायती राज व्यवस्था– पंचायत राज व्यवस्थेचा पाया रचण्याचे श्रेय देखील राजीव गांधींना जाते. जोपर्यंत पंचायत राज व्यवस्था मजबूत होत नाही, तोपर्यंत लोकशाही खालच्या पातळीवर पोहोचू शकत नाही, असे राजीव गांधींचे मत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी पंचायत राज व्यवस्थेचा संपूर्ण प्रस्ताव तयार केला. 24 एप्रिल 1993 पासून संपूर्ण देशात पंचायत राज व्यवस्था लागू झाली.
  • नवोदय विद्यालयांची पायाभरणी– राजीव गांधींनी ग्रामीण आणि शहरी भागातही नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. त्यांच्या कार्यकाळात जवाहर नवोदय विद्यालयाचा पाया रचला गेला. नवोदय विद्यालयात मुलांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि वसतिगृहात राहण्याची सोय मोफत मिळते.
  • NPE ची घोषणा– एनपीईची घोषणा राजीव गांधी यांनी केली होती. त्यांच्या सरकारने 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NPE) जाहीर केले होते. या अंतर्गत उच्च शिक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण आणि विस्तार देशभर करण्यात आला.
  • दूरसंचार क्रांती– संगणक क्रांतीप्रमाणेच दूरसंचार क्रांतीचे श्रेयही राजीव गांधींना जाते. राजीव गांधींच्या पुढाकाराने, भारतीय दूरसंचार नेटवर्कच्या स्थापनेसाठी ऑगस्ट 1984 मध्ये टेलिमॅटिक्सच्या विकासासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरापासून खेड्यांपर्यंत दूरसंचार जाळे सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी पीसीओ उघडू लागले. MTNL ची स्थापना 1986 मध्ये राजीव यांच्या पुढाकाराने झाली, ज्यामुळे दूरसंचार क्षेत्रात आणखी प्रगती झाली.

Dilip Walse Patil : पहिला वार! शरद पवारांची वळसे-पाटलांनी काढली ‘उंची’

राजीव गांधींचा आत्मघाती हल्ल्यात मृत्यू

राजीव गांधी 1984 ते 1989 या काळात देशाचे पंतप्रधान होते. 21 मे 1991 च्या रात्री ते तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आले असता मंचावर आलेल्या एका महिला आत्मघाती हल्लेखोराने त्यांना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. महिला हल्लेखोराने त्यांना पुष्पहार घालून त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच तिने कमरेला बांधलेल्या बॉम्बचे बटण दाबले. या स्फोटात राजीव गांधींचा मृत्यू झाला.

दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी सद्भावना दिवस साजरा केला जातो. सर्व धर्म, भाषा आणि प्रांतातील लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा वाढवणे हा सद्भावना दिवसाचा उद्देश आहे. 1992 मध्ये, राजीव गांधींच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर, काँग्रेसने हा दिवस सद्भावना दिवस म्हणून घोषित केला. यानिमित्ताने देशातील अनेक राज्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT