Shravan 2024: हिंदू धर्मात श्रावणी सोमवारचे काय आहे महत्त्व, कशी करतात पूजा?

मुंबई तक

Shravan 2024 : श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. हा महिना महादेवाशी संबंधित आहे. यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो.

point

श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा?

point

यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

Shravani Somwar 2024 : श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. हा महिना महादेवाशी संबंधित आहे. याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले. हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात. (Shravan 2024 What is the significance of Shravani somvar in hinduism how to worship know the detail information

वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते. ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे. यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

हेही वाचा : Jitesh Antapurkar : काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात. यादिवशी जप, तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते. सोमवार हा चंद्र ग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे. या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो.

श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय?

सोमवारी महादेवाची पूजा विशेषत: वैवाहिक जीवनासाठी केली जाते. जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी. कुंडलीत दोष किंवा आरोग्यासंबंधीत समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp